माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:भारत राष्ट्र समिती (BRS) चे मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांनी आज गुरुवारी भारत राष्ट्र समिती (BRS) बीड जिल्हा समन्वयक तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे नेते दिलीप गोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली.
यावेळी बीड जिल्ह्यातील भारत राष्ट्र समितीच्या सभासद नोंदणीचा व पक्ष कार्याचा आढावा घेण्यात आला थोरात यांनी घेतला .बी आर एस च्या जिल्हा कार्यालयाच्या भेटी प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी थोरात यांनी पक्षाचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाचे सभासद नोंदणी विषयावर चर्चा करून माहिती दिली.बीड जिल्ह्यातील गावागावात पक्ष पोहचण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करा असे थोरात यांनी सांगितले.
यावेळी शिवराज बांगर, कुलदीप करपे, अशोकराव पांढरे,विनोद पाटील,भास्कर खांडे,वचिष्ट बेडके,अमोल तीडके,श्रीकृष्ण चाटे, विलास नवले, नारायण करपे व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.