Friday, May 20, 2022

होय खरंच:प्लास्टिकची रिकामी बाटली द्या अन् मोफत प्रवास करा!

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या ऱ्हासाला केवळ ध्वनी, जल आणि वायू प्रदूषणच नव्हे, तर प्लास्टिकचा होणारा अति वापर हेही एक कारण आहे. प्लास्टिक कृत्रिमरीत्या तयार केलं जातं.

त्यामध्ये कार्बनचा वापर केला जातो. प्लास्टिकचं विघटन होत नसल्यामुळे प्लास्टिक पर्यावरणासाठी अतिशय घातक ठरत आहे. प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण सर्वच देशांसाठी एक मोठं संकट बनलं आहे.

आपलं आयुष्य प्लास्टिक प्रदूषणाविरहित बनवण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. सर्व देशांतल्या सरकारने यासाठी अनेक नियमही बनवले आहेत. आता असंच एक मोठं पाऊल संयुक्त अरब

अमिरातीनं उचललं आहे. यासाठी त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. याबद्दलची सविस्तर माहिती देणारं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे.यूएईच्या राजधानीचं शहर असलेल्या अबुधाबीमधल्या नगरपालिका आणि परिवहन

विभागाच्या एकात्मिक परिवहन केंद्रानं एक महत्त्वाची घोषणा केली आहे. यानुसार, सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना आता रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या देऊन मोफत प्रवास करता येणार आहे.

हे वृत्त ‘खलिज टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालं आहे.हा उपक्रम अबूधाबीची पर्यावरण एजन्सी , अबू धाबी कचरा व्यवस्थापन केंद्र ‘तडवीर’ आणि ‘डिग्रेड’ यांच्या सहकार्यानं सुरू करण्यात आला आहे. प्रमुख स्थानांवर

बाटल्या परत करण्याची ही योजना राबवण्यासाठी EAD सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांतल्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम करत आहे.लहान बाटलीला (600 मिली किंवा कमी) 1 पॉइंट, तर 600 मिलीपेक्षा जास्त क्षमतेच्या प्लास्टिक बाटलीला 2 पॉइंट्स मिळतील.

10 पॉइंट्सचं मूल्य 1 डरहॅम एवढं असेल. जेवढे जास्त पॉइंट्स जमतील, तेवढा जास्त प्रवास मोफत करता येणार आहे. अशा पद्धतीने या पॉइंट्सच्या आधारावर हा प्रवास करता येणार आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!