माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:भारत राष्ट्र समिती पक्षाची मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांनी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे भारत राष्ट्र समिती पक्षाच्या सभासद नोंदणी आणि प्रचार प्रसिद्धी मोहिमेमध्ये मांडवी येथे मराठवाडा समन्वयक थोरात यांनी सहभागी होऊन सभासद नोंदणी केली.
तसेच नोंदणी चे मार्गदर्शन करून समन्वयक यांना प्रात्यक्षिक करून दाखविले, नोंदणी आणि प्रचार प्रसिद्धी चे काम कसे करावे सविस्तर मार्गदर्शन थोरात यांनी केले.यावेळी पक्षाचे धनलाल पवार यांच्या पक्ष कार्यालयाचे श्री सोमनाथ थोरात यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले.
या पक्ष नोंदणीसाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.यावेळी राम रेड्डी ऐतवार, धनलाल पवार, श्री जाधव तसेच अनेक युवक नेते महिला पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.