माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांसंदर्भात कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिलेले असतानाच दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी अजित पवारांवर
न्यायालयाच्या आदेशाच्याविरोधात वक्तव्य केल्याचा दावा केलाय. न्यायालयाने पाच एप्रिलपर्यंत एसटीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश दिलेले असताना अजित पवारांनी ३१ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिल्याचं निदर्शनास
आणत एसटी कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय. त्यातच आज आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी एकाला चक्कर आल्यानंतर तिथे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं.
अजित पवारांच्या इशाऱ्यामुळे या व्यक्तीने धसका घेतल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागल्याचा दावा करत त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यात उपमुख्यमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी
मागणी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली.अजित पवारांनी या ठिकाणी अल्टिमेटम दिलेला होता. मात्र तो संवैधानिक भाषेचं उल्लंघन करणारा होता. जर संविधानानुसार न्यायालयाने
पाच तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करायची नाही असा आदेश दिलेला आहे. तरी अजित पवारांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन करणारं वक्तव्य अजित पवार यांनी काल केलं. त्याच्या धसक्याने या कर्मचाऱ्याचं काही बरं वाईट झालं तर त्यास
सर्वस्वी जबाबदार अजित पवार राहतील. या कर्मचाऱ्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर अजित पवारांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करावी,” असंही या प्रतिनिधींनी म्हटलं आहे.
एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांसंबंधी कठोर निर्णय घेतला जाण्याचे संकेत अजित पवार यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना दिले. “३१ तारखेपर्यंत सगळ्यांना संधी द्या असं सांगण्यात आलं होतं. उद्यापासून
कठोर निर्णय घेतला जाणार आहे अशी शक्यता आहे. उद्या वेळ पडली तर ज्यांना काढून टाकलं आहे त्यांच्या जागी नवीन भरती होऊ शकते,” असा इशारा अजित पवारांनी यावेळी दिला. “समितीचा जो रिपोर्ट आला त्यातही ज्या गोष्टी सांगितल्या त्या बऱ्याच
अंशी पूर्ण कऱण्याचा प्रयत्न केला आहे. पगारही पूर्वीच्या तुलनेच बऱ्यापैकी वाढवले आहेत,” असंही त्यांनी सांगितलं. कोर्टाने दिलेली मुदत संपली तर कठोर कारवाईचा अधिकार मंत्रिमंडळाला असतो असंही ते म्हणाले.