माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी – शनिशिंगणापूर रस्त्यावर उंबरे-माळवाडी येथे भीषण अपघात होऊन पाच वर्षाच्या मुलीसह पाच ते सहाजण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली
राहुरीकडून सोनईच्या दिशेने चाललेल्या एमएच 12 जीवाय 3818 या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षा एमएच 16 एजे 8748 ला पाठीमागून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी जोरात होती की, रिक्षाचे जागीच दोन तुकडे झाले. रिक्षात बसलेले प्रवासी त्यात तीन महिला एक पाच ते सहा वर्षाची मुलगी व एक पुरुष असे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी
राहुरी येथील रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. काल सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला.हा अपघात इतका भीषण होता की, दोघांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. तर इतर गंभीर जखमी झाले आहेत
उंबरे गावातील नागरिक व तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ राहुरी येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. घटनास्थळी तातडीची मदत करणारे युवक भाऊराव कवडे, संदीप गायकवाड,
अरुण गायकवाड, पप्पू कनगरे, सागर गायकवाड, गोरख धोत्रे, अण्णा गायकवाड, राजू वैरागर व ग्रामस्थ उपस्थित होते.