Wednesday, May 25, 2022

शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याची सुटी जाहीर

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपूर्वी राज्यभरातील ज्या शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हायचा आहे अशा शाळा एप्रिलमध्येही सुरु ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतला होता.

त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून येत्या मार्च आणि एप्रिल महिनाभर संपूर्ण उपस्थिती सह शाळा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. या निर्णयामुळे मात्र विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची

सुटी मिळणार नाही अस विद्यार्थी आणि पालकांना वाटत होतं. पण आता विद्यार्थ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे. अखेर शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्यांची तारीख घोषित करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व शाळांना येत्या 2 मे पासून तर 12 जूनपर्यंत उन्हाळ्याची सुटी असणार आहे. तसंच येणारं नवीन शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून सुरु होणार आहे. उन्हाळ्याच्या कमी करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना गणेशोत्सव, दिवाळी, नाताळ या काळात

दिल्या जाणार आहेत असं सांगण्यात आलं आहे. विदर्भातील उन्हाची दाहकता बघता विदर्भातील शाळा या 27 जूनपासून सुरु करण्यात येणार आहेत.मार्चमध्ये परीक्षा संपून एप्रिलच्या पहिल्या आठवडयात विद्यार्थ्यांना उन्हळ्याच्या सुट्या मिळत होत्या.

मात्र यंदा संपूर्ण मार्च आणि एप्रिल महिनाभर विद्यार्थ्यांची पूर्ण वेळ शाळा असणार आहे. इतकंच नाहीतर रविवारीही ऐच्छिक असल्यास शाळा सुरु ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे.

मात्र त्यानंतर किमान एक महिन्याची सुटी दिल्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद झाला आहे.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!