Tuesday, May 24, 2022

महाराष्ट्रातील या भाजपच्या माजी खासदाराचं महिलांबाबत वादग्रस्त विधान म्हणाले…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:माजी खासदार धनंजय महाडिक याचे महिलाविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. महिलांच्या कर्तृत्वावर उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे धनंजय महाडिक अडचणीत आले आहेत.

दरम्यान, कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचाराच्या दरम्यान वक्तव्य केले आहे. धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलाविषयी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या उमेदवार महिला आहेत. यामुळे महिलेला

मतं द्या, असं ते सांगतील. पण जे काम तुमचा प्लंबर असलेला, इलेक्ट्रिशियन असलेला नवरा करतो, ते तुम्हाला जमणार आहे का? ज्याचे काम त्यानंच करावं, अशी वक्तव्य महाडिक यांनी केल्याचे

या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे.भाजप उमेदवार सत्यजित कदम यांनी बुधवारी सकाळी कोल्हापुरातील कसबा बावड्यातून प्रचारफेरी काढण्यात आली. कसबा बावडा हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे ते गाव आहे.

यामुळे तिथे सतेज कदमांच्या प्रचार फेरीला कितपत प्रतिसाद मिळणार याची उत्सुकता सर्वांना होती. या प्रचार फेरीला भाजप आमदार सुरेश हाळवणकर देखील उपस्थित होते. त्यांनी भाजपच्या स्वागतासाठी

कसबा बावड्यातील महिलांनी काढलेली रांगोळी पालकमंत्र्यांच्या चमच्यांनी पाण्याचा टँकर आणून धुवून काढल्याची टीका करण्यात आली आहे. त्यांच्या या टीकेला पालकमंत्री सतेज पाटील

यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिले होते.एक महिला रस्त्यावर, दारात नव्हती यावरूनच भाजपच्या उमेदवारानं बावडेकरांच्या मनांत काय आहे? हे समजून घ्यावं, अशी वक्तव्य

त्यांनी केले होते. दरम्यान, छत्रपती ताराराणी महाराणींच्या नगरित येऊन महिलांचे योगदान विसरलात का? असा प्रश्न फ्रखील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार

धनंजय महाडिक यांना सर्वपक्षीय महिलांकडून करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!