Wednesday, May 25, 2022

नगर ब्रेकिंग:वडिलांना कुकर डोक्यात मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करत पेटवून दिले अन्

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून दारू पिऊन मुलाने शिवीगाळ करत वडिलांना कुकर डोक्यात

मारुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच राहते घर पेटवून दिले.या घरातील सर्व वस्तू खाक झाल्या असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रांजणखोल याठिकाणी शेरखान नबाबखान पठाण

हे आपल्या कुटुंबासमवेत जेवण करुन बसले असता त्यावेळेस त्यांचा मुलगा रईस पठाण हा दारू पिऊन घरात आला व जेवणाच्या कारणावरून शिवीगाळ करत वाद घालत होता. त्यावेळी त्याचे वडील शेरखान हे

त्यास समजावून सांगण्यास गेले असता रईस याने जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात कुकर मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यावेळी माझ्या कुटुंबियांनी मला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

त्या दरम्यान रईसने आमचे राहते घर पेटवून दिले. या आगीत घरातील सर्व वस्तू खाक झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आग विझविण्यास परिसरातील नागरिकांनी मोठी मदत केली.

याप्रकरणी शेरखान बाबरखान पठाण यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी रईस शेरखान पठाण याचेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!