माय महाराष्ट्र न्यूज: राहुल कोळसे:भारत राष्ट्र समिती पक्षाचे मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांनी गेल्या दहा दिवसांपासून दररोज पक्षाचे नाव नोंदणीसाठी मराठवाडा विभागात वेगवेगळ्या जिल्ह्यात जोरदार दौरा सुरू आहे.
थोरात यांनी परभणी येथे भारत राष्ट्र समिती पक्षाची सभासद नोंदणी व पक्षाच्या प्रचार प्रसिद्धी कामाची आढावा बैठक घेतली .याप्रसंगी नोंदणी प्रचार प्रसिद्धी कामाची माहिती घेतली अडीअडचणी कशा सोडवून कामाचा वेग कसा वाढवता येइल याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
बैठकीसाठी भारत राष्ट्र समिती पक्षाचे जिल्हा समन्वयक पवन करवर, विधानसभा समन्वयक पुरुषोत्तम खिस्ते, मंचक सोळंखे , रंगनाथ चोपडे, उद्धवराव शिंदे, भगवान शिंदे, राम लटके, बाळासाहेब आळणे, भगवान जोगदंड , बाळासाहेब काळे पाटील आदी उपस्थित होते.