माय महाराष्ट्र न्यूज:कोविडला देशातून पूर्णपणे नष्ट करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. मात्र, आकडेवारी पाहता, कोणत्याही धोरणामुळे कोरोनाचा नायनाट होईल, हे सांगणं कठीण आहे. शून्य कोविड धोरण आणि कडक
लॉकडाऊन असूनही चीनमध्ये कोरोनाची प्रकरणं भारतापेक्षा जास्त आहेत.भारताने निर्बंध हटवले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. हे समजून घेण्यासाठी, यावेळी कोविडचा प्रसार कसा होतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
झी हिंदीने याबाबतचं वृत्त दिलं आहे. आफ्रिकेतील प्रदेशांमध्ये कोरोना विषाणूची प्रकरणे 29 टक्क्यांनी कमी झाली आहेत. अमेरिकेतही 15 टक्क्यांनी घट झाली आहे. युरोपमध्ये, कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे गेल्या
आठवड्यापेक्षा 4% कमी नोंदली गेली आहेत. दक्षिणपूर्व आशियामध्ये कोरोना प्रकरणांमध्ये 14% घट झाली आहे.गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, कोरोना विषाणूच्या संदर्भात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन
कायदा १ एप्रिलपासून संपत आहे. या अंतर्गत, कोरोनाची कॉलर-ट्यून बंद होणार आहे. म्हणजेच, आता जेव्हा तुम्ही एखाद्याला कॉल कराल तेव्हा तुम्हाला खोकल्याचा आवाज किंवा लसीकरणाचं महत्त्व सांगणारा
आवाज ऐकू येणार नाही. आरोग्य मंत्रालयाने या सूचनांचे परिपत्रक सर्व दूरसंचार ऑपरेटरना पाठवलं आहे.आता दिल्लीत मास्क न घातल्यास चलन कापलं जाणार नाही. वैयक्तिक कारमध्ये मास्क घालण्याची
सक्ती संपली आहे. यासोबतच मुंबईनेही मास्क घालण्याची अट रद्द केली आहे. यासोबतच पश्चिम बंगालनेही मास्क सक्ती हटवली आहे. मात्र प्रत्येक राज्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, सुरक्षित अंतर
ठेवणे आणि हात स्वच्छ धुणे यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. परंतु व्यापकपणे कोणताही नियम अनिवार्य ठेवण्यात आलेला नाही.