Monday, May 23, 2022

2 मे पासून शाळांना सुट्टी जाहीर; वाचा सुट्यांचा कालावधी

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शाळा भरवा आणि सुट्ट्या लांबणीवर…यानिर्णयामुळे गेल्या आठवड्यापासून राज्यभर चर्चेत आलेले शाळांचे सुट्टी प्रकरणाला आता पूर्णविराम मिळणार आहे. शिक्षण

विभागाने आज काढलेल्या पत्रानुसार शाळांना सुट्या मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर यापुढे नव्या शैक्षणिक वर्षात महिन्याच्या दुसऱ्या सोमवारपासून शाळा भरणार आहे.

असा असेल सुट्यांचा कालावधीमुळात दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या- दुसऱ्या आठवड्यात पहिली ते नववी व अकरावीच्या वर्गाच्या परीक्षा घेऊन वाढत्या उन्हामुळे या शाळांना सुट्टी दिली जाते. तर नव्याने दहावी व बारावी

प्रविष्ट विद्यार्थ्यांचे सकाळच्या सत्रात एक मेपर्यंत जादा तासिका बहुतांशी शाळा घेतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे शाळा उशिरा सुरू झाल्याने बदल करून एप्रिलच्या पहिल्या तीन आठवड्यात शाळा भरवाव्यात व शेवटच्या आठवड्यात परीक्षा

घेऊन मग निकाल लावावा असे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र हा मुद्दा चर्चेचा बनल्याने पुन्हा शिक्षण विभागाने ज्या शाळाच्या परीक्षा ठरल्या, अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे, त्या शाळांना यातून सवलत दिली आहे.

 प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर व माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र देऊन सुट्यांबाबतची माहिती कळविली आहे.

तसेच याबाबत शासन स्तरावरून निर्णय जाहीर करावा असे या पत्रात म्हटले आहे. या पत्रानुसार संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीत सुसंगती आणण्यासाठी सोमवार २ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येईल तर रविवार १२ जुनपर्यंत

ही सुट्टी ग्राह्य धरण्यात येऊन नव्या शैक्षणिक वर्षात दुसऱ्या सोमवारी १३ जूनला शाळा सुरू होणार आहे. विदर्भामध्ये उन्हामुळे चौथ्या सोमवारी शाळा सुरू होतील. माध्यमिक शाळा संहिता नुसार शैक्षणिक वर्षातील

सर्व प्रकारच्या सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचनाही दिल्या आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!