माय महाराष्ट्र न्यूज:सिटी गॅस युटिलिटी महानगर गॅसकडून सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पाइप गॅसच्या किरकोळ किंमतीत 3.50 रुपये प्रति एससीएमने कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
हे दर आजपासून लागू होणार आहेत. यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारने सीएनजीवरील व्हॅट 13.5% वरून 3% पर्यंत कमी केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात माहिती दिली होती. एमजीएलने गुरुवारी एका निवेदनात, असे म्हटले आहे की, 1 एप्रिलपासून राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील व्हॅट 13.5
टक्क्यांवरून 3 टक्क्यांपर्यंत कमी केल्यामुळे, एमजीएलने याचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि आसपासच्या सीएनजीच्या किरकोळ किमतीत प्रति किलो 6 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
मुंबईकरांना आता सीएनजी 60 रुपयांनी मिळणार आहे. यासोबतच घरगुती पाइप्ड नॅचरल गॅसची किंमत 3.50 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.एमजीएलच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी
योग्य वेळी पुरवठा किंमतीमध्ये झालेल्या प्रचंड वाढीच्या परिणामाचे मूल्यांकन करेल आणि त्यानुसार किरकोळ किंमतीमध्ये सुधारणा करेल. आदल्या दिवशी, जागतिक ऊर्जा दरांमध्ये वाढ झाल्यामुळे केंद्राने 1 एप्रिलपासून
सहा महिन्यांसाठी देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूच्या किंमती दुप्पट केल्या होत्या आणि या निर्णयाचा फायदा रिलायन्स, ऑइल इंडियाला होणार आहे.सीएनजीवरील करात कपात केल्याने रिक्षा, टॅक्सी,
सार्वजनिक वाहतूक, प्रवासी वाहतूकदारांना त्याचा फायदा होईल. सीएनजीच्या दरात वाढ होत असताना राज्य सरकारने करात कपात केल्याने सामान्य जनतेला दिलासा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.