माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात असलेली इयत्ता बारावीची परीक्षा 4 ते 30 मार्च 2022 या कालावधीत घेण्यात येणार होती.
मात्र दिनांक 5 व 7 मार्च रोजी असलेल्या विषयांची परीक्षा अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे 5 एप्रिल व 7 एप्रिल रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते.दिनांक 5 एप्रिल रोजी प्रथम सत्रात सकाळी
10.30 ते 2 या वेळेत हिंदी विषयाचा पेपर होणार आहे तर द्वितीय सत्रात दुपारी 3 ते6.30 या वेळेत जर्मन, जपानी, चिनी, पारशियन या विषयाचे पेपर होणार आहेत.दिनांक 7 एप्रिल रोजी
प्रथम सत्रात सकाळी 10.30 ते 2 या वेळेत मराठी, गुजराती, कन्नड, सिंधी, रेबीक, देवनागरी, मल्याळम, तमीळ, तेलगु, पंजाबी आणि बंगाली या विषयाचे पेपर होणार आहेत तर द्वितीय
सत्रात दुपारी 3 ते 6.30 या वेळेत उर्दू, फ्रेंच, स्पॅनिश, पाली या विषयाचे पेपर होणार आहेत.