नेवासा
भेंडा येथील रहिवाशी असलेले राजेंद्र ज्ञानदेव चिंधे यांची
श्री.गजानन महाराज शुगर लि.(यूटेक) या खाजगी साखर कारखान्याचे उपशेतकी अधिकारी पदी नियुक्ति झाल्याने त्यांचा नागेबाबा परिवाराचे वतीने सत्कार करण्यात आला.
श्री.चिंधे हे सध्या संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेडच्या कृषी पर्यवेक्षक/ऊस पुरवठा अधिकारी या पदावर कार्यरत होते. कामाचा अनुभव प्रामाणिकपणा व निष्टा या सर्वांचा विचार करुन दि.१ जून २०२३ पासुन उपशेतकी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात येत असल्याचे पत्र कारखान्याचे सरव्यवस्थापक आर.व्ही. काळे
यांनी दिले आहे.
भेंडा येथे झालेल्या सत्कार कार्यक्रमा प्रसंगी नागेबाबा परिवाराचे सदस्य अजित रसाळ,सुखदेव फुलारी,आबासाहेब
काळे,संजय मनवेलिकर, भाऊसाहेब फुलारी यावेळी,सुभाष चौधरी उपस्थित होते.