Wednesday, May 25, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट उघड झाला आहे. ईमेलचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची

धमकी दिल्याचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) धमकीचे ई-मेल मिळाले आहेत.या कटाचा पर्दाफाश होऊ नये, म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे

ई-मेलरने म्हटले आहे. पंतप्रधान मोदींना मारायला तयार आहेत. त्यांच्याकडे 20 स्लीपर सेल आहेत. एकूण 20 किलो आरडीएक्स आहे.या मेलनुसार हल्ल्याची योजना तयार करण्यात आली आहे.

मेलमध्ये असे म्हटले आहे की, ज्या व्यक्तीने हा मेल लिहिला आहे त्याचे अनेक दहशतवाद्यांशी (terrorists) संबंध आहेत. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनेही गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना

धमकीचे ई-मेल पाठवले आहेत. ज्या मेल आयडीवरून हा मेल आला त्याची चौकशी सुरू आहे. हा ईमेल राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेकडे आला आहे.पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट उघड

झाल्यानंतर सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.मोदींना मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार असल्याचा उल्लेख मेल मध्ये असून त्यांना मारण्यासाठी 20 किलो

आरडीएक्स तयार असल्याचे म्हणले आहे. धमकी देणाऱ्याने त्यांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावा केला आहे. जुन महिण्यात केरळमधील गुरूवायूर मंदिरामध्ये पाचशे रूपयांच्या नोटावर मोदींना धमकीचा

एक संदेश मिळाला होता. मोदींनी 8 जून रोजी केरळमधील गुरूवायूर मंदिराला भेट दिली होती. भेटीपूर्वी एक दिवस आधी 7 जून रोजी हा धमकीचा संदेश मिळाला होता. मोदींना धमकी मिळाल्या

पासून स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने गंभीरतेने घेत सुरक्षा संस्थेला माहिती दिली होती.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!