Wednesday, May 25, 2022

नगरच्या पालकमंत्र्यांची शंभर कोटींहून अधिक संपत्ती बेनामी ? गंभीर आरोप

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची 100 कोटींपेक्षा अधिक संपत्ती बेनामी असून, त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला दिली आहे. हसन मुश्रीफ यांची बेनामी संपत्ती

जप्त करा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली.ठाकरे, पवार कारवाई करणार नाहीत. ते स्वतःच घोटाळेबाज आहेत. त्यामुळे एक घोटाळेबाज दुसर्‍या घोटाळेबाजाला मदत करत

असल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. पुण्यात प्राप्तिकर सदनमध्ये शुक्रवारी (दि.1) दुपारी सोमय्या आले होते. मुश्रीफ यांच्या विरोधात प्राप्तिकर विभागाकडे केलेल्या तक्रारीचे काय झाले, याची विचारणा

करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर सोमय्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला.सोमय्या म्हणाले, हे पैसे कुठून आले याची चौकशी झाली पाहिजे.

हा भ—ष्टाचाराचा पैसा आहे. त्यांची पवार, ठाकरे यांनी का चौकशी केली नाही? केंद्र सरकारच्या कंपनी मंत्रालयाने अधिकृत फौजदारी प्रक्रियेची याचिका दाखल केली आहे. एक एक मंत्री घोटाळ्यात सापडत आहेत.

त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. अनिल देशमुख, अनिल परब, हसन मुश्रीफ, संजय राऊत व अजित पवार ही सगळीच नावे घोटाळ्यातील आहेत. हे घोटाळे सिद्ध होत आहेत. तरीही मुख्यमंत्री म्हणून ठाकरे

काहीही कारवाई करायला तयार नाहीत. त्यांनी आता बोलणे बंद करून कारवाई करायला हवी.हा सर्व काळा पैसा कोणत्या माध्यमातून गोळा केला गेला, याची चौकशी करावी. जोपर्यंत कारवाई होत

नाही, तोपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...
error: Content is protected !!