भेंडा प्रतिनिधी राहुल कोळसे: नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र पावन दक्षिणमुखी हनुमान मंदिर भेंडा येथे भव्यदिव्य हनुमान जयंती निमित्त ध्वजारोहण आज शनिवारी सकाळी अकरा वाजता श्रीराम
साधना आश्रम मुकींदपूर येथील महंत सुनिलगिरी महाराज यांच्या शुभहस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.यावेळी नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम मिसाळ, लोकनेते मारूतरावजी
घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोक मिसाळ, गणेश गव्हाणे, डॉ आढाव, रविंद्र नवले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सुनिलगिरी महाराज यांनी बोलताना सांगितले की कोणतीही धर्मांचे काम करायचे असेल तर प्रारंभी
ध्वजारोहण हे अत्यंत महत्त्वाचे असते.येथील श्रीराम सेवा मंडळ निशकाम हनुमंत रायाची सेवा करत आहे.हनुमंत रायाची सेवा जो जो करतो तो नेहमी आनंदी असतो.या कार्यात जो तन,मन,धानाने
काम केले तर आपल्याला वैभव प्राप्त होते.जीवनात हनुमानंताची सेवा केली पाहिजे असे ही महंत सुनिलगिरी महाराज यांनी सांगितले.प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम सेवक व उद्योजक
बापूसाहेब नजन यांनी केले.या कार्यक्रम प्रसंगी वाल्मिक लिंगायत, गणेश गुरु कुलकर्णी, शिवाजी फुलारी, कल्याण मडके, विश्वास कोकणे, पत्रकार कारभारी गरड, नामदेव शिंदे, राहुल कोळसे, अर्जुन शिंदे, डॉ एल.व्ही मिसाळ, संभाजी मिसाळ,चांगदेव जगताप, समाधान शेलार,
किशोर मिसाळ,केशव पंडीत,बंडू अंदुरे, संतोष मिसाळ, योगेश मिसाळ,नवथर सर, आप्पासाहेब वायकर, गोरक्षनाथ कानडे,शरद मिसाळ,तात्या फुलमाळी,सराजी मिसाळ, आकाश मिसाळ, रमेश आरणे,
डॉ राहुल मिसाळ,सुभाष फुलमाळी,राहुल शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेलार सर यांनी केले तर आभार डौले सर यांनी मानले.