Wednesday, May 25, 2022

नगर जिल्हा बँकेच्या पीक कर्ज मर्यादावाढीचा निर्णय: कर्डिलेंने केला हा आरोप

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा बँकेच्या पीक कर्ज मर्यादावाढीचा निर्णय जाहीर करण्यावरून श्रेयवाद रंगला आहे. हा निर्णय बँकेचे संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी परस्पर जाहीर

केल्यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष उदय शेळके यांनी हा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाचा असल्याचे स्पष्टीकरण देत त्यांच्यावर टीका केली.जिल्हा बँकेच्या पीक कर्ज मर्यादा वाढीचा श्रेयवाद चांगलाच पेटला आहे.

माझ्या नावामुळे काहींना दडपण आले. पोट दुखणाऱ्या नेत्यांनी या निर्णयाबाबत स्पष्टीकरण देण्यास जिल्हा बँक अध्यक्षांना भाग पाडले. असा आरोप बँकेचे संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केला आहे.

दरम्यान, बँक आणि साखर कारखान्याला शंभर कोटींचा तोटा करणारेच या श्रेयवादाचे पडद्याआडील कळसूत्री असल्याचा त्यांचा रोख होता.दरम्यान यामुळे बँक वर्तुळ आणि सभासदांमध्ये खमंग चर्चा सुरू झाली आहे.

बँक सत्ताधारी मंडळ चालविते की शिवाजी कर्डिले अशी कुजबुज सुरू आहे. कर्डिले बँकेच्या निर्णयात एवढी दखल देत असतील तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष काय करतात, हा प्रश्नही चर्चेत आहे.

अध्यक्षांच्या स्पष्टीकरणावर कर्डिले यांनी निशाणा साधला आहे. कर्ज मर्यादा वाढविल्याबद्दल त्यांचा केडगाव येथे सत्कार झाला. या कार्यक्रमात त्यांनी या घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले,

जिल्हा बँकेच्या मंडळासमोर विषय आल्यावर संचालक त्यावर भूमिका मांडतात. तेच मी केले. यावेळी पीक कर्ज मर्यादा २० ऐवजी ३० हजार करावी, ही मागणी सर्व संचालकांनी मान्य 9 केली. बँकेतील निर्णय अध्यक्ष, उपाध्यक्ष व

संचालक मंडळ सर्वानुमतेच घेत असतात, यात दुमत नाही. पण हा निर्णय मी जनतेला सांगितला म्हणून काहींचे पोट दुखले. या दुखावलेल्या मंडळींना शांत करण्यासाठीच अध्यक्ष शेळकेंना

स्पष्टीकरणाचा खटाटोप करावा लागला असावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!