नेवासा
भेंडा येथील श्री.मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता १० वीचा ९५.०७ टक्के निकाल लागला आहे अशी माहिती प्रशासकीय अधिकारी भारत वाबळे यांनी दिली.
जिजामाता विदयालयाचे एकूण ३२५ विद्यार्थी १० वीच्या परिक्षेस बसले होते त्या पैकी ३०९ विद्यार्थी पास होऊन विद्यालयाचा निकाल ९५.०७ टक्के लागला आहे.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी असे…
प्रथम क्रमांक-कु.सिध्दी अण्णासाहेब नजन
(९६.४० टक्के गुण),
द्वियीय क्रमांक- कु.ईश्वरी बाळासाहेब फुलारी(९५.६० टक्के गुण),
तृतीय क्रमांक- कु.दिया शिवप्रसाद पोतदार (९५.४० टक्के गुण) .
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले,उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले,विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग, जेष्ठ संचालक अँड देसाई देशमुख, सचिव अनिल शेवाळे,सहसचिव रविंद्र मोटे आदीनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.