माय महाराष्ट्र न्यूज: एप्रिल महिन्याची सुरुवात झाली आहे आणि महिन्यात मोठ्या प्रमाणात नगर जिल्ह्यातील तापमान चांगलेच वाढले आहे यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना उन्हाचा तडाखा बसत आहे.
सध्या नगर जिल्ह्यात शाळा सुरू आहे .त्या मुळे विद्यार्थ्यांवर उन्हाचा तडाका बसत आहे यामुळे आता नगर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. चार एप्रिलपासून जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा सकळी सात ते दुपारी
साडेबारापर्यंत भरणार आहेत. तसा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी काढला आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्याने शाळांच्या वेळेत बदल करण्यात यावा,अशी मागणी शिक्षक
संघटनांमधून होत होती. राज्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. त्या प्रमाणे अहमदनगर जिल्हा परिषदेने शाळेच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी शिक्षक संघटनांमधून होत होती.
प्रशासनाने अखेर आज जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरविण्याचा निर्णय घेतला आहे. चार एप्रिलपासून सकाळी सात ते दुपारी साडेबारापर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळा भरणार आहेत.
सकाळी सातला शाळा भरणार असून सात ते सात वाजून दहा मिनिटांपर्यंत परिपाठ होऊन शाळा भरणार आहे. सात दहा ते नऊ वाजून ३५ मिनिटांपर्यंत एकूण चार तास होणार असून त्यामध्ये ३५ मिनिटांचे
तीन व चाळीस मिनिटांचा एक तास होणार आहे. नऊ वाजून ३५ मिनिटे ते दहा वाजून दहा मिनिटापर्यंत मधली सुट्टी राहणार आहे. दहा वाजून दहा मिनिटांपासून ते १२ वाजून ३०मिनिटांपर्यंत एकूण
चार तासिका होणार असून त्या ३५ मिनिटांच्या राहणार आहेत.पूर्वतयारीसाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सकाळी सात वाजेपूर्वी शाळेत उपस्थित राहावे. शाळेत उपस्थित नसलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यात येईल.
– संभाजी लांगोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर.