Saturday, September 23, 2023

तक्षशिला इंग्लिश मिडीअम स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा कायम

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तक्षशिला इंग्लिश मिडीअम स्कूलमधीचा फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली.

विद्यालयात प्रथम क्रमांक श्रद्धा शिवाजी चेडे (90.80%) हिने मिळविला. द्वितीय क्रमांक दिव्या दत्तात्रय कदम (90.20%) तर तृतीय क्रमांक दिया महावीर पटवा (89.00%)हिने पटकावला. चतुर्थ क्रमांक रुद्रप्रताप जितेंद्र देशमुख (88.80%) याने मिळवला. ज्ञानेश्वरी मंगेश देठे हिने 87.40% गुण मिळवत यश संपादन केले.

या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मन्वंतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विजय कदम, संचालिका शुभांगी कदम, समन्वयक कल्पना पवार, विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल कदम, उपप्राचार्य संदीप खाटीक, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना अशोक पवार, पुनम चिमखडे,

महेश शेळके, अनिल साबळे, अर्चना ढोले, मयुरी आढाव, रूपाली गरड, काजल शिंदे, सुवर्णा थोरात, शितल मिसाळ, सोनाली सावंत, रूपाली सावंत, मीनाक्षी मुंगसे, रेणुका पेहरे, अर्चना सरोदे, सोनाली वांढेकर, माधवी टिकल ,ज्योती खंडागळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल पालक व समस्त ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!