माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात कांद्याचे हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यामुळे शेतकरी कमी कालावधीत चांगला नफा मिळतो. नगर जिल्ह्यात शेतकरी हे कांद्याकडे वळालेले बघायला मिळत आहे .पण सध्या कांद्याच्या भावात घसरण झाली आहे.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा यार्डमध्ये आठवडाभराच्या खंडानंतर काल गुढीपाडव्याच्या दिवशी कांदा लिलाव झाले. मराठी नववर्षाच्या
प्रारंभी मार्केटमध्ये 14 हजार 503 गोण्या (844 टन) कांद्याची आवक झाली. जास्तीत जास्त भाव 1250 रुपयांपर्यंत निघाले.एक-दोन लॉटला 1200 ते 1250 रुपये भाव मिळाला.
मोठ्या कलरपत्ती कांद्याला 1000 ते 1100 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 900 ते 1000 रुपये, गोल्टा कांद्याला 400 ते 700 रुपये, गोल्टी कांद्याला 200 ते 400 रुपये तर हलक्या कांद्याला 200 ते 300 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.