Wednesday, May 25, 2022

संत गोदड महाराज यांच्यासमोर भाकित यंदा होणार…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:यंदाच्या वर्षामध्ये सर्वत्र चक्रीवादळ व वादळी वार्‍यासह पाऊस पडून मोठ्या प्रमाणामध्ये हानी आणि नुकसान होणार आहे.

याचा त्रास राजा व प्रजा या दोघांना होणार असल्याचे भाकित कर्जत येथे संत गोदड महाराज यांच्यासमोर व्यक्त करण्यात आले आहे.कर्जत येथील संत सदगुरु गोदड महाराज यांनी साठ वर्षाची संवत्सरी लिहून ठेवली आहे.

यामध्ये पिकपाणी त्याचप्रमाणे राजकारण, संकटे, नैसर्गिक आपत्ती याबाबत संपूर्ण जगाचे भाकित लिहून ठेवले आहे. याचे वाचन दरवर्षी चैत्र पाडव्याच्यादिवशी मंदिरांमध्ये करण्यात येते.

सुमारे दोनशे वर्षांपासून ही परंपरा आहे. गोदड महाराज मंदिराचे विश्वस्त पुजारी पंढरीनाथ महाराज काकडे यांनी या संवत्सरीचे वाचन आज केले. ते ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक आणि भाविक उपस्थित होते.

सलग दोन वर्षे करोनामुळे भाविकांना हे भाकित मंदिरात येऊन ऐकता येत नव्हती. यावर्षी मात्र करोना निर्बंध उठवले. यामुळे मोठ्या संख्येने भाविक उपस्थित.गोदड महाराज यांच्या या

भाकित त्यामध्ये सांगितले आहे की, यावर्षी शुभ कृत संवत्सरी असून याचा स्वामी बूध आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडणार आहे. पिके देखील चांगली येणार आहेत. मात्र वैशाख

ज्येष्ठ आषाढ श्रावण आणि भाद्रपद या महिन्यांमध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये वादळ वारा पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे.यावर्षी पाऊस मान चांगले सांगितले असून मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार आहे.

खरीप हंगामात पिके चांगली येणार असून सुरुवातीला पाऊस आहे. नंतर मात्र ओढ देण्यात आली आहे. मात्र सरासरी एवढा पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी जास्त पावसाने नासाडी होण्याची शक्यता आहे.

मुग, ऊस, गहू, भात ही पिके मुबलक येणार आहेत. या वर्षी पाऊस पडणार असून धान्य येणार आहे. मृग नक्षत्र चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!