माय महाराष्ट्र न्यूज:नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी 1 एप्रिल 2022 पासून दीड लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजावर अतिरिक्त कर कपातीचा लाभ मिळणार नाही. कलम 80EEA अंतर्गत उपलब्ध
असलेला हा लाभ 2019 च्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला होता. परवडणाऱ्या घरांच्या खरेदीला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश होता.अर्थसंकल्प 2019 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा
केली की प्रथमच गृहखरेदी करणार्यांना परवडणारी घरे खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर अतिरिक्त सवलत मिळू शकते. सुरुवातीला ही सूट केवळ
1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 दरम्यान मंजूर केलेल्या कर्जांसाठीच सूट मिळू शकत होती. त्यानंतर वित्त विधेयकांमध्ये कर्जाची मुदत 31 मार्च 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आणि शेवटी
ती 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली. आता यापुढे हा कालावधी वाढवण्यात आला नाही.कर लाभ प्राप्तिकर कायदा, 1961 च्या कलम 24(b) अंतर्गत उपलब्ध असलेल्या गृहकर्जाच्या
व्याजावर भरलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर सूट देण्याव्यतिरिक्त आहे. या लाभाचा क्लेम करण्यासाठी आणखी एक अट ती म्हणजे घराच्या मालमत्तेचे मुद्रांक शुल्क 45 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.