Wednesday, May 25, 2022

नगर ब्रेकिंग:विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरुद्ध

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:चारित्र्यावर संशय घेत एका 22 वर्षीय विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले.

रुपाली गितेश कोठवळ (वय 22, रा. पेमगिरी, ता. संगमनेर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत मच्छिंद्र महादू पडवळ (रा. कर्जुलेपठार, ता. संगमनेर) यांनी संगमनेर तालुका

पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 2021 मध्ये रुपाली व गितेश यांचे लग्न झाले होते. रुपालीने आपल्या मनाप्रमाणे लग्न केले होते. त्यानंतर ती सासरी पेमगिरी येथे नांदत होती.

दरम्यान लग्नाच्या दोन महिन्यानंतर गितेश हा रुपालीवर संशय घेवू लागला.माहेरच्या लोकांशी देखील रुपालीला बोलू दिले जात नव्हते. त्यानंतरही रुपाली हीस वारंवार मारहाण होत होती. ‘तु माहेरील

लोकांशी बोलते, तंबाखू अकोट लावते, म्हणून देखील तिला मारहाण होत होती. गितेश हा रुपालीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या सर्व कारणावरुन रुपाली हिचा तिचा पती गितेश बाळासाहेब कोठवळ,

सासरा बाळासाहेब रामभाऊ कोठवळ, सासू संगिता बाळासाहेब कोठवळ (सर्व रा. पेमगिरी, ता. संगमनेर) व मुलाचा मामा अनिल गोडसे, मामी लता ऊर्फ पुष्पा अनिल गोडसे (रा. गोडसेवाडी, ता. संगमनेर) यांनी

शारिरीक व मानसिक छळ केला. या कारणावरुन रुपाली हिने 31 मार्च 2022 रोजी दुपारी 3 वाजता पेमगिरी येथे राहत्या घरामागील विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली.

या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी वरील आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 113/2022 भारतीय दंड संहिता 306, 498 (अ), 323, 34 प्रमाणे दाखल केला आहे.

अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. ठाकरे करत आहे. दरम्यान मयत विवाहीतेचा पती गितेश

कोठवळ यास पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपी पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!