माय महाराष्ट्र न्यूज:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दाखल झाले आहेत. नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या घरी
भेटीसाठी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.येत्या काळात मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे
या निवडणुकांत भाजप-मनसे युती होणार का? अशी ही चर्चा सुरू झाली आहे.काही दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले होते. राज ठाकरे हे आपल्या
नव्या घरात शिफ्ट झाल्यानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या घरी दाखल झाले होते. 24 नोव्हेंबर रोजी दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट झाली होती. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस
हे राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थावर दाखल झाले होते. ही एक कौटुंबिक भेट असल्याचं बोललं गेलं होतं. मात्र, तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट बोलता येणार नाही. कारण, गेल्या काही दिवसांत
राज ठाकरेंची हिंदूत्वाच्या संदर्भात घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. यासोबतच मनसे आणि भाजप यांची आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकांत युती होण्याचीही गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.
या आधी देखील भाजप नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावेळी देखील मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, काही मुद्द्यावर एकमत न झाल्यामुळे युतीची चर्चा फिसकटल्याचं म्हटलं जात होतं.
मात्र आता युती होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. शिवाय उत्तर प्रदेशची निवडणुक उरकली असून भाजपचा युतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांच्या विरोधामुळे युती आधी होऊ शकली नाही, असंही काहींना वाटत.