माय महाराष्ट्र न्यूज:राहाता बाजार समितीत काल रविवारी कांद्याच्या 2312 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त 1300 रुपये इतका भाव मिळाला. राहाता
बाजार समितीत 2 हजार 312 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 900 ते 1300 रुपये भाव मिळाला.कांदा नंबर 2 ला 550 ते 850 रुपये, कांदा नंबर 3 ला उन्हाळी 200 ते 500 रुपये
भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 ते 800 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला आहे.तर डाळिंबाच्या 769 क्रेट्सची आवक झाली. डाळिंबाला नंबर 1 ला प्रति किलोला
कमीत कमी 151 रुपये तर जास्तीत जास्त 205, डाळिंब नंबर 2 ला 101 ते 150 रुपये, डाळिंब नंबर 3 ला 61 ते 100 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 60 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.