Tuesday, May 17, 2022

नगर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांने m.com च्या शिक्षणानंतर सुरू केली शेती आज कमावतो लाखो रुपये

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शेती हा व्यवसाय असा आहे, ज्यामध्ये भांडवल गुंतवणूक केल्यानंतर, परतावा (नफा)मिळेलच याची शाश्वती नसते. 

तसेच शेतीमध्ये दिवस-रात्र कष्ट करावे लागतात, म्हणजेच येथे वेळेला खूप महत्व असते.ऊन,वारा,पाऊस,थंडी,अंधार अशा प्रकारे काहीही असो पण शेतीमध्ये वेळेवर कामं करावी लागतात.

नजर हटी दुर्घटना घटी, ही म्हण शेती व्यवसायाला तंतोतंत लागू पडते.शेतमालाकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी पिक वाया जावू शकते.म्हणून दिवस-रात्र कधीही कामं करावी लागतात,तेंव्हा यश मिळते.

असेच यशस्वी शेतकरी,गोरक्षनाथ लांडगे यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.हे शेतकरी पिंपळगाव लांडगा या गावातील आहे.

यांचे गाव अहमदनगर पासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणजेच या गावाचा जिल्हा आणि तालूका नगरच आहे.

पिंपळगाव लांडगा या गावासाठी कोणत्याही धरणाचे पाणी नाही,तसा पाऊस बर्यापैकी आहे पण 12 महिने शेतीसाठी पाणी पुरेसे पडत नाही. त्यामुळे बारमाही पिके या गावात घेतली जात नाही, फक्त खरीप आणि रब्बी हंगामातील पिके घेतली जातात.

गोरक्षनाथ लांडगे यांचे शिक्षण M.Com झाले, नंतर त्यांनी पुढील शिक्षण बंद केले आणि नौकरी न करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना शेती करण्याची आवड होती.

शिक्षन झालेले असल्यामुळे बदलते जग त्यांना चांगलेच माहीत होते,त्यामुळे ते शेतीमध्ये नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत असत.

गोरक्षनाथ लांडगे यांना 9 एकर शेती असल्यामुळे पुर्ण शेतीला पाणी पुरत नसे, त्यामुळे त्यांनी 2016 साली 30 गुंठ्याचे शेत-तळे निर्माण केले आणि आपली सर्व शेती ओलिताखाली आणली.

त्यांची प्रमुख पिके कांदा, डाळिंब आणि सोयाबीन आहेत.ही सर्व पिके यशस्वीरित्या चांगल्या ऊत्पादनासह घेण्यात, गोरक्षनाथ चांगलेच तज्ञ झाले.

प्रगतशील शेतकरी, गोरक्षनाथ यांना सेंद्रिय खतांचे महत्व चांगलेच माहीत असल्यामुळे 55 किलोमीटर लांबून,त्यांनी कंपोष्ट आनले,कारण ते प्रगतशील आणि जागृत शेतकरी आहेत.

गोरक्षनाथ यांनी आपल्या कांदा पीकासाठी रासायनिक खत बॅग एकरी फक्त 3 वापरल्या आणि कंपोष्ट खत बॅग 10 वापरल्या,यंदा कांदा ऊत्पादन कमी खर्चात 13 टन च्या आसपास निघेल असा अंदाज आहे,अस गोरक्षनाथ यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी गोरक्षनाथ यांना संपर्क करु शकता, त्यांचा नंबर पुढीलप्रमाणे-

संपर्क- 9284792846

कंपोष्ट खत ऊत्पादक-

मागील वर्षी(2021) मी(संतोष तारडे) नवीनच कंपोष्ट खत ऊत्पादन आणि विक्री चालू केली होती.माझे पहिले ग्राहक गावातीलच(ब्राम्हणी) बाबासाहेब हापसे होते(10 बॅग) त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे प्रकल्प संचालक गायकवाड साहेब यांनी कंपोष्ट खताचा रिपोर्ट बघीतल्यानंतर 30 बॅग घेतल्या.

तीसरे ग्राहक गोरक्षनाथ लांडगे,यांनी कंपोष्टचा रिपोर्ट बघीतल्यानंतर (सोशल मिडीयातून)सर्वात जास्त कंपोष्ट बॅगा घेतल्या (40 बॅग)त्यावेळी मी नवीनच कंपोष्ट खत ऊत्पादक असल्यामुळे, या 40 बॅग माझ्यासाठी भरपुर होत्या आणि माझ्या गावापासून 55 किलोमीटर एवढ्या दुरच्या अंतरावर नेल्या होत्या.

अशा प्रकारे मागील वर्षी मी एकूण 563 कंपोष्ट खत बॅगांची विक्री केले आणि चालू वर्षी खरीप हंगामात 1500 बॅग विक्री करण्याचे नियोजन आहे.

सर्व पिकांसाठी ऊपयुक्त असे सेंद्रिय कंपोष्ट खत विक्री चालू आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा-

संतोष तारडे, ब्राम्हणी

संपर्क – 9890920536

अधिक माहितीसाठी लिंक ला भेट द्या

https://www.santoshtarde.in/?m=1

ताज्या बातम्या

मनी प्लांटशी संबंधित या 5 चुका नका करू…नाहीतर होईल नुकसान, जाणून घ्या

माय महाराष्ट्र न्यूज:वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने आर्थिक समृद्धी येते. घरामध्ये माळरान ठेवल्याने सुख-समृद्धी येते. याशिवाय मनी प्लांट हे रोप ऑफिस किंवा दुकानातही ठेवता येते....

महाराष्ट्रातील मोठी बातमी! महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत सुप्रिम कोर्टाचा मोठा आदेश

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी घ्यायच्या याबाबत सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरु आहे. जिथे पावसाळा आहे तिथे मान्सून नंतर निवडणूका घ्या असा...

ऑनलाइन क्लास सुरू असताना प्राध्यापिकेच्या मोबाइलवर आला अश्लील व्हिडिओ

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन क्लास सुरू असतानाच विद्यार्थिनींसह प्राध्यापिकेच्या स्मार्टफोनवर अश्लील मेसेज आणि व्हिडिओ आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड शहरात उघडकीस आला. विष्णुपुरी ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा...

या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

माय महाराष्ट्र न्यूज:काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या...

या पठ्ठ्याने म्हणून दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला

माय महाराष्ट्र न्यूज:वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी...

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी : काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकविध मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागला आहे. स्थानिक...
error: Content is protected !!