Wednesday, May 25, 2022

नेवासा ब्रेकिंग:मुकादम बाप-लेकाचा माय-लेकीवर बलात्कार

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ऊसतोड करणाऱ्या माय-लेकीवर मुकादम पिता-पुत्रांनी अत्याचार केला. याप्रकरणी शिवून पोलिस

ठाणे ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे पीडितांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. नेवासे तालुक्यात घटना घडल्याने शिवून पोलिसांनी गुन्हा

नेवासे पोलिसांकडे वर्ग केला. वडजी (ता. वैजापूर) येथून मुकादम जिब्राइल शेख, त्याचा मुलगा अन्वर शेख व शहनाज जिब्राईल शेख या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.वडजी ता. वैजापूर येथील

जिब्राइल बाबू शेख हा ऊसतोडणीसाठी साखर कारखान्यांना मजूर पुरविण्याचे काम करतो. तो मजूर शोधण्यासाठी नांदगाव (जि. नाशिक) येथील एका कुटुंबाला भेटला. त्याने मजुरीपोटी या

कुटुंबास २०१८ मध्ये एक लाख २० हजार रुपयांची उचल दिली. नेवासे तालुक्यात ऊसतोडणीचे काम सुरू असताना जिब्राइलचा मुलगा अन्वर याने मजुराच्या कुटुंबातील पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार केला.

ही घटना मुलीच्या आईला समजल्यावर तिने जिब्राइलकडे तक्रार केली. त्याने मुलीच्या आईस शिवीगाळ करत तिला दमदाटी करत तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. सातत्याने सुरू असलेल्या या प्रकारामुळे मुलगी

गर्भवती राहिली. तिचा वैजापूरला गर्भपात करण्यात आला.पीडितेच्या फिर्यादीवरून गुरुवारी (दि.३१) रात्री उशिरा तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. हा गुन्हा नेवासे

पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.माय-लेकींसह अल्पवयीन मुलीची सुटकातपासात शिवून पोलिसांनी वडजी (ता. वैजापूर) येथून जिब्राइल शेख, त्याची पत्नी शहनाज, मुलगा अन्वर यांना ताब्यात घेतले. तसेच बंद घरातून पीडित माय-लेकींसह एका बारा वर्षीय मुलीची सुटका केली.

घडलेला प्रकार पीडित महिलेने नांदगाव येथील बहिणीला सांगितला. बहिणीने आधार बहुउद्देशीय विकास संस्थेच्या अॅड. विद्या कसबे यांना ही घटना सांगितली. अॅड. कसबे यांनी येवल्यातील

सीमा आरोळे, कॅथलिन जोगराव व पुण्यातील सहकारी संस्थेतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वैजापूर तालुक्यातील शिवूर पोलिस ठाणे गाठले.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!