माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक शहरात तापमान कमालीचे वाढले आहे. अशातच उष्माघातामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
जळगावमध्ये एका जणाचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पार सतत वाढत असल्याने अंगाची लाही-लाही होत आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घराबाहेर न पडता सावलीचा व थंड पेयाचा आधार घेत आहेत. जळगाव आणि विदर्भाता उन्हाने कहर केला आहे. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिजर्व बँक चौकात
एका व्यक्तीचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना कॉटन मार्केट परिसरात घडली आहे.धक्कादायक म्हणजे, दोन्ही व्यक्तींचे मृतदेह रस्त्यावर मृतावस्थेत सापडले होते. पोलिसांनी त्याचा पंचनामा
करून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असता प्राथमिक अहवालात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष पुढे आला.धक्कादायक म्हणजे, दोन्ही व्यक्तींचे मृतदेह रस्त्यावर मृतावस्थेत
सापडले होते. पोलिसांनी त्याचा पंचनामा करून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असता प्राथमिक अहवालात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष पुढे आला.तर, जळगावात आणखी
एकाचा उष्माघाताने बळी गेला आहे. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील 48 वर्षीय शेतमजुराचा उष्मघाताने मृत्यू झाला आहे. उष्णाघाताचा चाळीसगाव तालुक्यात
पहिला तर जळगाव जिल्ह्यातील दुसरा बळी गेल्याने जिल्हा हादरला आहे.