Wednesday, May 25, 2022

व्हॉट्सॲप’नं आणले ‘हे’ ६ नवीन फिचर्स, जाणून घ्या काय आहे त्यात खास

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:व्हॉट्सॲप मध्ये सातत्याने नवीन बदल होत असतात. यामध्ये युजर्सची मागणी आणि काळाची गरज यानुसार अनेक अपडेट होत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये

असेच काही बदल दाले असल्याचे व्हॉट्सॲपच्या WABetaInfo या अधिकृत वेबसाईट आणि सोशल मीडियावर सांगण्यात आली आहे. व्हॉट्सॲप हे अॅप आपल्या युजर्ससाठी असेच काही

नवनवे फीचर्स बाजारपेठेत आणण्यासाठी टेस्टिंग करत आहे. चला तर पाहूया कोणते आहेत हे भन्नाट फीचर्स.व्हॉट्सॲपवर मध्ये इमोजी रिअॅक्शन हे नव्याने येऊ घातलेले फीचर आहे. यामध्ये आपण इमोजीद्वारे

एखाद्याच्या संदेशावर प्रतिक्रिया देऊन आपल्या भावना व्यक्त करू शकतो. समजा एखाद्याने तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या किंवा दुसरा एखादा संदेश पाठवला तर, तुम्हाला शब्द टाईप न करता प्रतिक्रिया

द्यायची असेल तर या फीचर अंतर्गत तुम्ही इमोजी वापरून प्रतिक्रिया देऊ शकता.व्हॉट्सॲप आणखी एक नवीन फीचर आणले आहे, हे फीचर व्हॉईस मेसेजशी संबंधित आहे. हे फीचर आणल्यानंतर

यूजर्स बॅकग्राउंडमध्ये व्हॉट्सॲप चॅट विंडोमध्ये प्ले केलेला व्हॉइस मेसेज देखील ऐकू शकतील असे सांगण्यात येत आहे. युजर्सना व्हॉईस मेसेजच्या खाली पॉज आणि रिझ्युमचा पर्याय दिसेल, जो चॅटच्या बाहेरही उपस्थित असेल.

तसेच, वेव्हफॉर्म व्हिज्युअलायझेशन अंतर्गत, युजर्सना व्हॉइस मेसेज ऐकण्याचा चांगला अनुभव मिळेल.तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता, या युनिकोडमधील नवीनतम समाविष्ट केलेल्या इमोजी आहेत.

ज्याचा वापर आपलेला संदेशावर प्रतिक्रिया देण्यासाठी करण्यात येईल. काही इमोजी हे त्वचेसंबंधी रिअॅक्शनला समर्थन देतात. हे सर्व इमोजी फक्त बीटा व्हर्जनसाठीच उपलब्ध आहेत.

WhatsApp ने संदेशांमध्ये प्राप्त झालेल्या फोन नंबरसाठी नवीन पॉप-अप मेनूची चाचणी सुरू केली आहे. या नवीन फीचर्समध्ये तुम्हाला चॅटमध्ये नंबरवर क्लिक केल्यास डायल करायचा की तुम्हाला तुमच्या संपर्कांमध्ये

जोडायचा हे निवडण्याची परवानगी विचारेल.व्हॉट्सॲपने संदेश फॉरवर्ड करण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला आहे. एकापेक्षा जास्त ग्रुपवर मेसेज फॉरवर्ड करण्यावर बंदी घालणार आहे. मेसेजिंग अॅप

या फीचरची चाचणी सध्या सुरू आहे. हे फीचर आल्यास अनेक यूजर्सच्या अडचणी वाढतील, जे मेसेज फॉरवर्ड फीचरचा जास्त वापर करतात. तसेच फॉरवर्ड केलेले मेसेज एका वेळी एकापेक्षा जास्त ग्रुप चॅटवर

फॉरवर्ड करणे शक्य होणार नाही . या निर्णयामुळे काही प्रमाणात फेक न्यूज किंवा चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.व्हॉट्सअॅप आपला कॅमेरा इंटरफेस देखील अपडेट करणार

असल्याचे समजत आहे. WhatsApp चे हे कॅमेरा अपडेट फीचर iOS युजर्संसाठी आधीच उपलब्ध होते पण काही युजर्सच्या तक्रारींमुळे ते काही काळासाठी थांबवण्यात आले होते. आता कंपनी हे फीचर

अँड्रॉईड यूजर्ससाठीही सादर करणार आहे. हे अपडेट युजर्सना फोटो किंवा व्हीडीओ सिलेक्ट करताना एक नवीन डिझाईन दिसत आहे. त्याचवेळी स्क्रीनच्या बाजूला कॅमेराचा मीडिया बारही दिसतो.

ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...

धक्कादायक:नवरा झोपी गेल्याचे पाहून मध्यरात्री नवरी पळून गेली अन् पुढे…

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर रात्री जेवण करुन घरातील सदस्य झोपले होते. नवराही झोपी गेला. हीच रात्रीची संधी साधत नवरीने दागिने, मोबाईल घेत पळ काढला. रात्री...

शिवाजीराव कपाळे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

राहुरी:सोशल सर्विस फौंडेशन श्रीरामपूर व श्री इम्पेक्स मॉल यांच्या वतीने दिला जाणारा ‘समाजरत्न पुरस्कार’ साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांना प्रदान करण्यात आला....

नगर जिल्ह्यात कांद्याचे भाव स्थिर जाणून घ्या भाव

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक 24/05/2022 रोजी कांद्याची 3414 गोणी आवक झाली. एक नंबर कांद्यास 1225 रुपये प्रति...
error: Content is protected !!