माय महाराष्ट्र न्यूज:Instagram फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर मेसेजिंगचा अनुभव अधिक मजेदार आणि सुलभ करण्यासाठी Instagram सात नवीन फिचर्स आणण्याची तयारी करत आहे.
1.सात फिचर्सपैकी पहिले फिचर युजर्सला इनबॉक्समध्ये न जाता थेट चॅटला उत्तर देण्याची परवानगी देईल. यात एक नवीन क्विक सेंड फिचर देखील आहे जे युजर्सला शेअर बटणवर टॅप
करून आणि होल्ड करून त्यांच्या जवळच्या मित्रांसह पोस्ट सहजपणे रीशेअर करण्यास अनुमती देईल.2. यूजर्स इनबॉक्सच्या टॉपवर ते मित्र दर्शविले की जे ऑनलाईन चॅट करण्यासाठी उपलब्ध आहेत.3. यूजर्स आता
कोणत्याही गाण्याबाबत ३० सेकंदचा प्रिव्ह्यू शेअर करण्यासाठी सक्षम आहेत, ज्यामध्ये मित्र ते चॅट विंडोमार्फत ऐकू शकतात.4. या प्रिव्ह्यूला अधिक सक्षम करण्यासाठी Instagram ने Apple Music, Amazon
Music आणि Spotify सोबत काम करणार आहे.5. चॅट पसर्नलाईज करण्यासाठी एक लो -फाय चॅट थीम देखील सुरू करणार आहे.6. इंस्टाग्राम यूजर्ससोबत मेसेजमध्ये @silent अॅड करून कोणत्याही फ्रेन्डला
नोटिफिकेशन न पाठवता मेसज पाठवू शकता.7. अखेर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूजर्सला इंस्टाग्रामवर ग्रुप चॅटमध्ये Polचा देखील पर्याय देणार आहे.