Friday, May 20, 2022

नगर ब्रेकिंग: खळबळजनक: त्या विवाहितेचा गळा दाबून व विषारी औषध पाजून घेतला जीव

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर शहरातील विनायकनगरच्या समता कॉलनीत घरामध्ये संशयितरित्या मृतावस्थेत आढळून आलेल्या विवाहितेच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.

गळा दाबून व विषारी औषध पाजून विवाहितेचा जीव घेतला. जिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार विवाहितेचा खून झाला असल्याने कोतवाली

पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वाढीव खुनाच्या गुन्ह्याचे कलम लावण्यात आले आहे. सरोज रवी उपाध्ये (वय ३० रा. विनायकनगर, अहमदनगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

तिचा भाऊ अशोककुमार नंदकिशोर तिवारी (वय ३७ रा. दिल्ली, मुळ रा. राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीमध्ये सरोजचा पती रवी मुरलीधर उपाध्ये, सासरा मुरलीधर हकुमचंद उपाध्ये, सासू परमा मुरलीधर उपाध्ये व नणंद

पुजा सुनील जोशी (सर्व रा. विनायकनगर) यांचा समावेश आहे. पती रवी उपाध्ये याला अटक करण्यात आली आहे. त्यांनी सरोजचा गळा दाबून व विषारी औषध पाजून जीव घेतल्याचे समोर आल्यानंतर आरोपीविरूध्द

खूनाच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे करीत आहेत.२८ मार्च, २०२२ रोजी सरोज मृतअवस्थेत आढळून आली होती. यानंतर तिच्या

मृतदेहाचे जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुरूवातीला पती, सासू-सासरे व नणंद यांच्याविरोधात आत्महत्येप्रवृत्त करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता वाढीव खूनाचे कलम लावण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!