Monday, May 23, 2022

शेतकऱ्यांसाठी म्हत्वाची बातमी: खरीप सोयाबीन पेरणीसाठी घरच्या बियाणांवरच भर देण्याचा सल्ला

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात सर्वच जिल्ह्यामध्ये उन्हाळी सोयाबीन आहे असे नाही. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये बियाणांचा प्रश्न हा उपस्थित होणारच आहे. शिवाय खरीप हंगामात

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे बियाणे प्रमाणितच आहे असे नाही. यंदा खरिपासाठी खात्रीलायक बियाणे नसल्याचा दावा खुद्द कृषी विभागानेच केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवरच

भर देण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. शिवाय बाजारपेठेतील बियाणे हे प्रमाणित असेलच असे नाही. त्यामुळे या बियाणाच्या वापरामुळे उत्पादनात घट येऊ शकते. याबाबत कृषी विभागाकडून

आतापासून जनजागृती केली जात आहे. उन्हाळी हंगामात ज्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा पेरा केला आहे त्यांनी देखील हे बियाणे प्रमाणित करुनच वापरण्याचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

उन्हाळी हंगामातील सर्वच भागातील पीक बहरात असे नाही. वातावरणातील बदलाचा परिणाम या पिकावरही झाला आहे. अवकाळी आणि सध्याचे ढगाळ वातावरण यामुळे सोयाबीनवर

कीड-रोगराईचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे हे सोयाबीन बियाणासाठी वापरणे धोक्याचे होणार आहे. यामुळे उत्पादनात घट होऊ शकते. रब्बी हंगामात सोयाबीनचा पेरा करण्यासाठी खरिपातील सोयाबीन

शेतकऱ्यांनी विक्री केले आहे. खरीप हंगामात उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना घरचेच बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.बियाणांची योग्य काळजी घेतली तरच ते प्रमाणित राहणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणाची साठवणूक करताना पोत्यांची थप्पी ही सातपेक्षा अधिक असू नये. शिवाय याची साठवणूक ही कोरड्या जागेत करावी लागणार आहे. एवढेच नाही तर साठवणूक करण्यापूर्वी जमिनीवर

लाकडी फळ्या किंवा पुट्टे अंथरुन त्यावर बियाणे साठवावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणांची तीन वेळा उगवण क्षमता पाहूनच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!