Friday, May 20, 2022

नगर ब्रेकिंग:तु नाही आली तर ! अश्लील फोटो व्हायरलची धमकी देत महिलेवर अत्याचार 

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मेडीकल चालविणार्‍या एका महिलेशी फोनवर गुलुगुलु बोलुन त्याने मैत्री केली. त्यानंतर व्हॉटसअ‍ॅपवर चॅटींग करुन हायबाय करत थेट प्रेमाची साद घातली आणि महिलेला

वेगवेगळी अमिष दाखवून संगमनेरातील एका फर्मासी कॉलेजवर बोलविले. तेथे काही चर्चा केल्यानंतर तिला विश्वासात घेऊन गाडीत टाकले आणि नांदुर शिंगोटे परिसरात रस्त्याच्या कडेला गाडी

लावून तिच्यावर अत्याचार केले. असाच प्रकार एका लॉजवर देखील करण्यात आला. या दरम्यान या तरूणाने या महिलेचे अर्धनग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. ही घटना दि. 10 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी

7 वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, तेव्हापासून तर आजवर आरोपी हा वेळोवेळी ब्लॅकमेल करीत होता. त्यामुळे, पीडित महिलेने गुरूवार दि. 31 मार्च 2022 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आपली तक्रार

दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी उबेद मन्सुर पटेल (रा. साकुर, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील राजापूर परिसरात

राहणारी एक महिला संगमनेर शहराच्या लगत मेडिकल व्यावसाय करत होती. त्यानंतर तिचा एका तरुणासोबत संपर्क झाला. हा तरुण गोळ्या-औषधे घेण्यासाठी मेडिकलमध्ये आला होता. तेव्हा काही औषधे

उपलब्ध नसल्यामुळे, त्याने महिलेचा मोबाईल नंबर घेतला होता. त्यानंतर त्यांच्यात चॅटींग सुरू झाली. हाय-बाय आणि नंतर त्यांच्यातील गप्पांना रंग चढला. गोळ्या औषधे विचारण्यापलिकडे तो फोनवर गोडगोड बोलुन तिला नेहमी प्रभावित करीत होता.

त्यानंतर त्यांच्यात काही दिवसांपासून फोनवर दिर्घकाळ चर्चा होत होती. त्यामुळे, काल झालेली मैत्री, अधिक दृढ होत गेली त्याच्या प्रेमाने बोलण्याला ती भाळली गेली. सन 2021 मध्ये आरोपी पटेल याने पटविलेल्या या महिलेला त्याने संगमनेरमधील एका फार्मासी

कॉलेजवर बोलविले. या दरम्यान ती नको म्हणत होती. मात्र, याने तिला भेटण्यासाठी मजबूर केले. त्यामुळे, ती गेली आणि त्या दिवशी आरोपी पटेल याने तिला एका मारुती सुझुकी कारमध्ये बसविले.

दरम्यान, यांच्यात गाडीत बसल्यानंतर काही चर्चा झाल्या. तेव्हा देखील पटेल याने तिच्याशी चांगल्या गोडगोड गप्पा मारल्या. हे एका रोडने जात असताना आरोपी उबेद पटेल याने एका निर्जन ठिकाणी रस्त्याच्या

कडेला गाडी थांबविली. महिलेने विचारणा केली असता हा खाली उतरला आणि याने गाडीच्या काचा वर घेऊन गाडी पुर्ण पॅकबंद केली. तर, महिलेची इच्छा नसताना देखील तिच्यावर अत्याचार केला आणि पुन्हा जेथून घेतले तेथे आणून सोडले. असे पीडित

महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. तर, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात देखील आरोपी याने तिला असेच बोलावून घेतले आणि कोणत्यातरी रस्त्याच्या कडेला निर्जनस्थळी गाडी नेऊन अत्याचार केला. हा प्रकार येथेच थांबला नाही. तर, नंतरच्या काळात देखील पटेल हा तिला

नांदुर शिंगोट्यात घेऊन गेला. तेथे त्याने एक लॉज शोधला आणि तेथे देखील पीडित महिलेची इच्छा नसताना तिच्यावर अत्याचार केला.  पटेल हा संबंधित महिलेला फार त्रास देत होता. मात्र, सांगावे तर कोणाला? असा प्रश्न तिला पडला होता.

एकदा पटेलचा तिला फोन आला तेव्हा त्याने तिला भेटायला बोलविले होता. मात्र, ही गेली नाही त्यामुळे, पटेल म्हणाला की, आता तु आली नाही तर मी तुझ्या मुलीला आणि तुला गाडीखाली चिरडून टाकेल. असल्या धमक्यांना पीडित महिला वैतागली होती.

त्यामुळे, तीने हा सर्व खराखरा प्रकार आपल्या जवळच्यांना कथन केला आणि थेट पोलीस ठाणे गाठून उबेद पठाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: टेम्पो पलटी होऊन मोठा अपघात या अपघातात दोनजण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली घाटात मक्याची कणसे घेऊन जाणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात दोनजण...

मोटारसायकल, स्कूटर चालकांनो सावधान!जाणून घ्या नवा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट घातले की आपण निर्धास्तपणे दुचाकी वाहन चालवू शकू आणि आपल्याला कोणत्याही नियमाची अडचण येणार नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही सावध होण्याची...

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...
error: Content is protected !!