नेवासा
नेवासा पोलीसांकडुन तालुक्यातील अवैध धंदे चालकांवर मोठ्या प्रमाणावर छापे टाकुन कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांनी दिली.
नेवासा पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दि.३१ मे रोजी पासुन नेवासा पोलीस स्टेशन मार्फत नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध रित्या चालणाऱ्या अवैध धंदे चालकांवर धाडसत्र सुरू असून आजपर्यंत नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचे अधिपत्याखालील असलेले तपास पथकातील पोलीस अंमलदार महिला पोलिस नायक सविता उंदरे पोकॉ सुमित करंजकर, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ अप्पासाहेब तांबे, पोकॉ गणेश ईथापे यांनी कुकणा दूरक्षेत्र हद्दीमध्ये दारुबंदी कायद्यान्वय एकुण ३, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ३, प्रवरासंगम दूरक्षेत्र हद्दीमध्ये दारुबंदी कायद्यान्वये ४, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ४, नेवासा खुर्द गावामध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये १ व नेवासा फाटा परिसरामध्ये दारुबंदी कायद्यान्वये १ अशा एकुण १५ अवैध धंदे चालकांवर छापे टाकुन एकुण ५४ हजार ३९० रुपयांचा देशी दारु, जुगाराचे साहित्य व रोख रक्कमेसह मुद्देमाल मिळुन आलेला असुन सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. एकुण १५ अवैध धंदे चालकांविरुध्द पोलीस स्टेशन नेवासा येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले असुन गुन्ह्यांचा पुढील तपास महिला पोलिस नायक सविता उंदरे ह्या करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक शिवाजी डोईफोडे, मपोना सविता उंदरे, पोकॉ सुमित करंजकर, पोकॉ गणेश ईथापे, पोकॉ अप्पासाहेब तांबे, पोकॉ शाम गुंजाळ यांनी केली असुन पुढील तपास मपोना सविता उंदरे पोलीस ठाणे नेवासा ह्या करीत आहेत.