माय महाराष्ट्र न्यूज:दरवर्षी खरिपात बियाणांचा तुटवडा, विक्रेत्यांकडून फसवणूक यामुळे उत्पादनात घट हे ठरलेलं आहे. यंदा खरिपातील पिकाला लाजवेल असे सोयाबीन शेत शिवारात बहरत आहे.
निसर्गाच्या कृपादृष्टीने खरिपात नुकसान झाले तरी उन्हाळ्यातील सोयाबीन पीक जोमात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर खरिपातील बियाणांचा
तर प्रश्न मिटणार आहेच पण यामुळे उत्पादनातही वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच योग्य नियोजन केले तर फायद्याचे ठरणार आहे. कृषी विभागाच्या पुढाकारातूनच उन्हाळी सोयाबीनची
संकल्पना ही समोर आली आहे. यंदा विक्रमी क्षेत्रात उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेतले गेले आहे. शिवाय आता याच सोयाबीनचा बिजोत्पादनासाठी उपयोग करण्याचा सल्ला कृषी विभागाच्या माध्यमातून दिला जात आहे.
येत्या उन्हाळी हंगामात सोयाबीनच्या एमएयूएस 71, एमएयूएस 162, एमएयूएस 612, फुले किमया, फुले संगम या वाणांचा 6 हजार 996 हेक्टरवर बीजोत्पादन प्रस्तावित आहे. बीजोत्पादन
कार्यक्रम आरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा, आधार कार्ड, बॅंक पासबूकची झेरॅाक्स ही जिल्हा महाबीज कार्यालयात जमा करावे लागणार आहे. त्यानंतरच आरक्षण करुन घेतले जाणार असल्याचे
विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोने यांनी सांगितले आहे.उन्हाळी सोयाबीनचा उतारा हा कमीच असतो. कारण बिगर हंगामात हा प्रयोग केला गेला आहे. शिवाय कीड व रोग आणि उन्हाची
तीव्रता यामुळे उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील सोयाबीनमधून उत्पादनाची आशा न बाळगता शेतकऱ्यांनी थेट बीजोत्पादन करुन बियाणे करावे असा सल्ला कृषी विभागाच्या
माध्यमातून दिला जात आहे. शिवाय उन्हाळी हंगामातील सोयाबीनचा मुळात हाच उद्देश आहे. बीजोत्पादन करुन शिल्लक सोयाबीन विक्री केले तर फायदा शेतकऱ्यांचाच आहे.
पण आहे ते सोयाबीन विकून पुन्हा बियाणांसाठी भटकंती करण्यापेक्षा बीजोत्पादनावर भर देणे गरजेचे आहे.