Monday, May 23, 2022

नगर ब्रेकिंग: भाजपाच्या त्या नगरसेविका विरोधात दरोडा, खंडणी, विनयभंग गुन्हा दाखल

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:घर खाली करण्यासाठी घरात अनाधिकाराने प्रवेश करून कुटूंबियांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सहा ते सात जणांविरूध्द

तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आता वाढीव कलम लावण्यात आले आहे. त्यानुसार आता दरोडा, खंडणी व विनयभंग आदी कलमे वाढविण्यात आली आहेत.

औरंगाबाद रोडवरील एका व्यक्तीने फिर्याद दिली होती. त्यानुसार नगरसेवक स्वप्नील शिंदे, अभि बुलाखे व इतर चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. फिर्यादी व्यक्तीच्या घरात

11 मार्च, 2022 रोजी रात्री शिंदे, बुलाखे व इतरांनी प्रवेश करून घर खाली करण्यासाठी कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच घर खाली करण्याच्या

कारणासाठी 11 मार्च रोजी साडेआठच्या सुमारास शिंदे व इतरांनी त्यांना शिंदे यांच्या कार्यालयात बोलवून डांबून ठेवत लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

शिंदे व इतरांनी यापूर्वी देखील फोन करून व घराचे नुकसान करून त्यांना घर खाली करण्यासाठी त्रास दिला होता. यानुसार तोफखाना पोलिसांनी नगरसेवक शिंदेसह त्याच्या साथीदारांविरूध्द भादंवि कलम

452, 342, 324, 143, 147, 148, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास सुरु असताना घेण्यात आलेल्या जबाबानुसार पोलिसांनी 395, 385 व 354 या कलमांची वाढ केली आहे.

त्यामुळे नगरसेवक शिंदेंसह त्यांच्या साथीदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नगरसेवक शिंदेविरूध्द तोफखाना, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तोफखाना

पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात वाढीव कलम लावण्यात आल्याने शिंदेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ताज्या बातम्या

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...
error: Content is protected !!