माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी कांद्याची 15 हजार 383 गोण्या (8 हजार 363 क्विंटल) आवक झाली.
भाव जास्तीत जास्त 1350 रुपयांपर्यंत निघाले असून ते शनिवारच्या तुलनेत 100 रुपयांनी अधिक आहेत. सोमवार 4 एप्रिल रोजी एक-दोन लॉटला 1200 ते 1350 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
मोठा कलर पत्तीवाल्या कांद्याला 1000 ते 1200 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 900 ते 1000 रुपये, गोल्टा कांद्याला 400 ते 700 रुपये, गोल्टी कांद्याला 200 ते 500 रुपये, जोड कांद्याला
200 ते 400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. हलक्या डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
तर राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल सोमवारी 2683 गोणी कांदा आवक झाली. कांद्याला सर्वाधिक 1250 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनला 7260 रुपये इतका सरासरी भाव मिळाला.
राहाता बाजार समितीत काल 2 हजार 683 कांदा गोणी आवक झाली. कांदा नंबर 1 ला 950 रुपये ते 1250 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला 500 ते 900 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 3 ला 200 ते 500 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 600 ते 800 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 250 रुपये भाव मिळाला