गुहा प्रतिनिधी माय महाराष्ट्र न्यूज राहुल कोळसे:महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दिला जाणारा सक्षम सहकार सक्षम महिला पुरस्कार साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन सौ संगीताताई कपाळे यांना प्रदान करण्यात आला .
बारामती अॅग्रो व भीमधडी जत्राच्या संचालिका सुनंदाताई पवार ,आमदार श्वेताताई महाले साईबाबा संस्थान शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत ,राजश्रीताई पाटिल,सुहासिनी कोयटे,
सीताबाई मोहिते,शुभलक्ष्मी कोरे ,काकासाहेब कोयटे ,सुरेशराव वाबळे , डॉ.शांतिलाल शिंगी,सुदर्शन भालेराव ,दादाराव तुपकर ,शिवाजीराव कपाळे उपस्थित होते.साई आदर्श पतसंस्थेच्या माध्यमातून
आदर्श व्यवहारामुळे सहकार क्षेत्रामध्ये सौ संगीताताई कपाळे यांनी वेगळे अस्तित्व जिल्ह्यामध्ये निर्माण करून यशाच्या शिखराला गवसणी घातली आहे.त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .
सौं कपाळे म्हणाल्या की सहकार चळवळ ग्रामीण भागात आर्थिक नाडी म्हणून ओळखली जाते . चळवळ आणखी वाढावी निकोप व्हावी अशी आमची अपेक्षा आहे.त्यामुळे त्या दृष्टिकोणातुन
काम करत आहोत असे पुरस्कार हे नक्कीच मनोधैर्य वाढविणारे आहेत.