भेंडा/अ.नगर
प्लास्टिक पिशव्या या विघटन न होणारा कचरा आहे आहेत. त्यामुळे प्लास्टिकची विल्हेवाट लावणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. सिंगल यूज प्लॅस्टिक पिशव्या हे आज जलाशय,जमीन प्रदूषणाचे मुख्य कारण बनले आहे.त्यांच्या हानिकारक प्रभावामुळे पर्यावरण व निसर्गाचा ऱ्हास होत असल्याने पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातून सिंगल यूज प्लास्टिकला हद्दपार करा असे आवाहन जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले
भारत सरकार केद्रीय संचार ब्यूरो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, अहमदनगर,निर्मल ग्राम भेंडे बुद्रुक ग्रामपंचायत व जलसंवर्धन फाउंडेशन भेंडे यांचे संयुक्त विद्यमाने
“प्लास्टिक हटवा” ही थीम घेऊन जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. सोमवार दि. 05 जून 2023 स.10 वाजता भेंडे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाचेअध्यक्षस्थान सरपंच प्रा. उषाताई लहानू मिसाळ यांनी भूषविले.
पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम मिसाळ
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जलमित्र सुखदेव फुलारी, वनरक्षक राहुल शिसोदे, दत्तात्रय काळे,अशोकराव मिसाळ, भाऊसाहेब फुलारी,उपसरपंच मंगल गोर्डे,बापूसाहेब नजन आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी पर्यावरण दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण रोपण करण्यात आले. लोकशाहीर हमीद सय्यद यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून “जागर पर्यावरणाचा” या विषयावर कलापथकाद्वारे जनजागृती केली.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय अहमदनगर केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री.पी.फणीकुमार यांनी प्रास्ताविकातून पर्यावरण दिनाचे महत्व विशद करून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.
सिंगल यूज प्लास्टिक,वृक्ष,जल व मृदा संवर्धन,घन कचरा व सांड़पाणी व्यवस्थापन या विषयावर बोलताना जलमित्र सुखदेव फुलारी पुढे म्हणाले की, सिंगल युज फॉर प्लॅस्टिकच्या वापरामुळे घरामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हा कचरा मानव व पशु दोन्हीच्या आरोग्यास घातक आहे. त्यामुळे तो उघड्यावर न टाकता त्याची योग्य विल्लेवाट लावणे गरजेचे आहे. आपल्या घरात विविध मार्गाने येणारे प्लास्टिक एकत्र साठवून ठेवून त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. प्लास्टिक पिशव्या ऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिक बाटली ऐवजी धातूच्या पाटलांचा वापर करावा.पर्यावरण म्हणजे जैविक व अजैविक घटकांचा समूह असून यातील प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे.जमिनीची सुपीक माती, पाणी,वृक्ष,वन्यजीव, पशुपक्षी हवा हे सर्वच घटक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी साठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्याचे संरक्षन व संवर्धन करावे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रा. उषाताई मिसाळ म्हणाल्या, पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चालला आहे त्याला खरंतर मानवच जबाबदार आहे. आदिमानवाच्या काळापासून मानवाच्या जसा कर्जा वाढत गेल्या तसतसे पर्यावरणाचे संतुलन ही बिघडणेस सुरुवात झाली.दिवसेंदिवस निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला ही आपणच कारणीभूत आहोत.
जंगलाला लागलेला वनवा विझविन्यात चिमणीने केलेल्या प्रयत्नात सारखेच पर्यावरण संवर्धनासाठी आपण आपलेही छोटे का होईना योगदान दिले पाहिजे.
भेंडा ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे जतन करण्याचे काम सुरू आहे. घंटा गाडीच्या माध्यमातून एक दिवस प्लास्टिक साठी उपक्रिय उपक्रम राबल्या जाणार असून प्रत्येकाने आपापल्या प्लास्टिक कचरा एकत्र साठवून ठेवून घंटागाडी मध्ये त्यांचे आवाहन त्यांनी केले.
डॉ.संतोष फुलारी यांनी वृक्ष लागवड व संवर्धन,वनरक्षक
राहुल शिसोदे व चांगदेव ढेरे यांनी वन्यजीव संरक्षन या विषयावर मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ फुलारी, नामदेव निकम, अण्णासाहेब गव्हाणे,किशोर मिसाळ, देवेंद्र काळे,दादासाहेब गजरे, दिलीप गोर्डे,कादर सय्यद,
यडूभाऊ सोनवणे,सुनील वांढेकर,संभाजी मिसाळ,
पत्रकार बाळकृष्ण पुरोहित, कारभारी गरड,नामदेव शिंदे, रमेश पाडळे,राहुल कोळसे,सतीश शिंदे,
ग्रामविकास अधिकारी रेवनाथ भिसे,कामगार तलाठी बद्रीनाथ कमानदार ,बाबासाहेब गोर्डे, विष्णू फुलारी, रामभाऊ देशमुख, कोतवाल सुभाष महाशिकारे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थिताना प्लास्टीक हटवा चा संदेश देण्यासाठी कापड़ी पिशवी व भिंति पत्रके भेट देण्यात आली.
अशोक पंडित यांनी सूत्रसंचालन केले.डॉ.लहानु मिसाळ यांनी आभार मानले.