Wednesday, May 25, 2022

नगरसह महाराष्ट्रातील उशिरा तुटलेल्या उसाला एकरी 25 हजार रुपये नुकसान

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:उशिरा तुटलेल्या ऊसाला एकरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. अजित काळे यांनी शेतकरी संघटनेच्या बैठकीत केली.

शेतकरी संघटनेच्यावतीने दि. 16 एप्रिल 2022 रोजी आयोजित ऊस परिषदेच्या नियोजनासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

राज्यासह जिल्ह्यात उपस्थित झालेल्या अतिरिक्त उसाच्या प्रश्नाच्या अनुषंगाने ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.16 एप्रिल रोजी श्रीरामपूर येथील लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालयात

दुपारी 1 वा. ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेमध्ये विविध मागण्यांचा विचार विनिमय होणार आहे. त्यात प्रामुख्याने दोन साखर कारखान्यासह दोन इथेनॉल कारखान्यांमधील हवाई

अंतराची 25 किलोमीटरची अट रद्द व्हावी, स्व. गोपिनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची दहा रुपयांची कपात ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बिलातून रद्द करावी, उशिरा तुटलेल्या उसाला एकरी 25 हजार

रुपये व गाळपाअभावी शिल्लक राहिलेल्या उसाला एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, विज बिल, पाणीपट्टीसह संपूर्ण कर्जमाफी मिळावी, आदी मागण्यांचा समावेश आहे.

दि.16 एप्रिल रोजी होणार्‍या ऊस परिषदेसाठी महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून अ‍ॅड. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली ही परिषद होणार आहे.

शेतकर्‍यांनी हजारोंच्या संख्येने यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केलेे.

ताज्या बातम्या

मोदी सरकार साखर निर्यातीवर बंदी घालण्याच्या तयारीत ?

माय महाराष्ट्र न्यूज:जगात साखरेचं सर्वाधिक उत्पादन भारतात होतं. तर साखरेच्या निर्यातीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात भारतापेक्षा जास्त फक्त ब्राझील हा देश सर्वाधिक साखर...

मोठी बातमी:पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी येण्याची आॅफर

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये ओबोसींचा अपमान केला जात आहे. काल औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांना बाऊंसरची भूमिका वठवावी लागली. हे पाहून हसांव की रडावं, असा...

पुढील वर्षी साखर कारखाने सुरू करण्याबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात अद्यापही 16 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप राहिले आहे. मराठवाडा, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड या भागातील सर्वात जास्त ऊस शिल्लक राहिल्याने...

मोठी बातमी: इंदोरीकर महाराजांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द

माय महाराष्ट्र न्यूज:कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे आठ दिवसांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इंदोरीकर महाराजांचं महाराष्ट्रात मोठं नाव आहे. ते प्रसिद्ध...

नगरसह या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज 

माय महाराष्ट्र न्यूज:मागच्या चार दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही भागात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा पावसाची शक्यता...

सरकारने बदलला सीम घेण्यासंदर्भात महत्त्वाचा नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्याला सिम कार्ड घ्यायचं असेल तर काय करावं लागतं? आपण कोणत्याही मोबाइल स्टोरवर जाऊन आपलं ओळखपत्र देतो, त्याद्वारे सिम अलॉट केलं जातं आणि...
error: Content is protected !!