माय महाराष्ट्र न्यूज:मुलाने त्याच्या आईला तिच्या बॉयफ्रेंडसह S E X करताना पाहिले. यानंतर रागाच्या भरात त्याने आईच्या प्रियकराची हत्या केली आहे. पवईत हा थरार घडला आहे.
मनीष नाईक या तरुणाने राजेश वैद्य नामक व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या केली. पवई पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
त्याच्या आईचे राजेश वैद्य याच्याशी अनैतिक संबंध होते. मृत वैद्य हा हाऊसकीपिंग पर्यवेक्षक म्हणून नोकरीला होता. तर नाईक हा वैद्य यांच्या हाताखाली काम करत होता.
वैद्य यांचे त्याच्या आईशी शारीरिक संबंध असल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या हल्यानंतर वैद्य यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र दुर्दैवाने त्यांचा अतिक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला.दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार राजेश वैद्य यांचा भाऊ धरमवीर याने त्याला शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका पार्क केलेल्या
ऑटोरिक्षात जखमी अवस्थेत पाहिले आणि ही घटना उघडकीस आली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नाईक हा घरात गेला असता त्याला वैद्य हे आईशी शारिरीक संबंध प्रस्थापित करताना दिसले.
त्यामुळे यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर नाईकने त्याच्या पाठीत वार केला.वैद्य पळत असताना नाईकनेही त्याचा पाठलाग केला आणि त्याच्या छातीत वार केले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, नाईकला
मद्यपानाची सवय आहे आणि तो वैद्य यांच्या हाताखाली नोकरीला असून, मृताच्या पश्चात त्याची पत्नी आणि २ मुले आहेत. नाईकने गुन्हा करण्यासाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.
त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.