Monday, May 23, 2022

मोदी सरकारची मोठी कारवाई, पहिल्यांदाच तब्बल इतक्या …

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काही यूट्यूब चॅनलवर मोठी कारवाई केली आहे. खोट्या बातम्या आणि भारतविरोधी कंटेंट पोस्ट केल्याबद्दल मंत्रालयाने 18 भारतीय आणि चार

पाकिस्तान आधारित YouTube चॅनल ब्लॉक केले आहेत. या यूट्यूब चॅनलने लोकांची दिशाभूल करण्यासाठी टीव्ही चॅनलचे लोगो आणि खोट्या थंबनेलचा वापर केला होता, अशी माहिती आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या यूट्यूब चॅनलचा वापर भारतीय सशस्त्र सेना, जम्मू आणि काश्मीर सारख्या विविध विषयांवर तसंच पाकिस्तानमधून चालवल्या जाणाऱ्या

अनेक सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे एकत्रित केलेला भारतविरोधी कंटेंट पोस्ट करण्यासाठी केला जात होता. तसंच पाकिस्तानमधून भारताविरोधात फेक बातम्याही पसरवल्या जात होत्या.

त्याशिवाय या ब्लॉक केलेल्या यूट्यूब चॅनलवर सध्याच्या युक्रेनमधील स्थितीचा फेक कंटेंट पोस्ट केल्याचंही सांगण्यात आलं आहे. इतर देशांसोबतचे भारताचे परराष्ट्र संबंध धोक्यात आणण्याचा यामागचा उद्देश आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या यूट्यूब चॅनलवर मोठ्या प्रमाणात व्ह्यूवर्स होते. Viewers ची संख्या जवळपास 260 कोटींहून अधिक होती.2021 डिसेंबर ते आतापर्यंत मंत्रालयाकडून एकूण 78 यूट्यूब

चॅनल ब्लॉक करण्यात आले आहेत. त्याशिवाय सोशल मीडिया अकाउंट्सदेखील बॅन केले आहेत, ज्याद्वारे चुकीची, फेक माहिती पोहोचवली जात होती.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...

चाणक्याच्या ‘या’ गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, तुम्ही कधीही नाही होणार अपयशी

माय महाराष्ट्र न्यूज:चाणक्य नीतीनुसार कोणतेही काम करताना त्याच्या सुरुवातीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीची सुरुवात चांगली होते तेव्हा तिचा शेवटही चांगला...

नवरा-बायकोमध्ये सतत वाद होतायत, हे उपाय केल्यास वाढेल प्रेम

माय महाराष्ट्र न्यूज: व्यस्त जीवनशैलीमुळे नवरा-बायको एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू शकत नाहीत. वेळेची कमतरता आणि अनेक कारणामुळे अनेकदा नात्यामध्ये गैरसमज निर्माण होतात. अशातच या...

जे नको व्हायला हवे तेच घडले;ओमायक्रॉनचा तो प्रकार भारतात आढळला

माय महाराष्ट्र न्यूज:ऑनलाईन ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार BA.5 ची नोंद तेलंगणामध्ये झालेली आहे. पूर्ण लसीकरण झालेल्या ८० वर्षं वयाच्या एका वृद्धात कोव्हीड विषाणूचा हा नवा...

नगर जिल्ह्यातील या भाजपाच्या नेत्यांचा निशाणा : शरद पवार यांची ही जुनीच नीती

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाच्या बोलावलेल्या बैठकीवर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जो बूॅंदसे गई...

नगर जिल्ह्यात खरिपासाठी पहिल्या टप्प्यात फक्त इतके बियाणे उपलब्ध

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरू असून १७ प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या बियाणांचे नियोजन आखण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी सुमारे ७० हजार २१...
error: Content is protected !!