Tuesday, May 24, 2022

मावशीनचे भाचीचा बनवला आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मग

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:माय मरो पन मावशी जगो” अशी मावशीची महती सांगणारी म्हण आपन नेहमी एकत असतो, पण भंडाऱ्यात एक धक्कादायक

घटना घडली आहे. भंडाऱ्यातील मावशीने नात्यातील सर्व सीमा पार केल्या आहेत. चहात गुंगीचे औषध टाकून भाचीला बेशुद्ध करून एका मुलाच्या साह्याने आक्षेपार्ह व्हिडीओ मावशीने बनवल्याचा प्रकार

समोर आला आहे. इतकंच नाही तर हा व्हिडीओ बनवून भाचीला ब्लॅकमेल करण्यात येत होते. भंडारा जिल्ह्यात साकोली येथे ही घडना घडली आहे.धक्कादायक म्हणजे ज्या मुलाने व्हिडीओ शूट केला तो

आरोपी गेल्या एक वर्षापासून पीडित मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीने तक्रार दिल्यानंतर शोषण करणाऱ्या मुलाला आणि मावशीला साकोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

25 वर्षीय गोवर्धन बावनकुळे असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी हा लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा येथे राहणारा आहे.संबधित पीडित मुलगी ही गोंदिया जिल्ह्यातील असून एक

वर्षापूर्वी मार्च 2021 मध्ये पीडित मुलगी आणि तिची आई साकोली तालुक्यातील एका गावात चुलत मावस बहिणीकडे विवाह समारंभाकरिता आली होती. समारंभ आटोपल्यानंतर दोघेही मुक्कामी थांबले

त्यावेळी चुलत मावशीने पीडितेला चहा दिला आणि तिला साड्या पाहण्याकरिता बोलाविले. काही क्षणातच पीडित मुलीला चक्कर आली आणि काही वेळानंतर मुलगी उठली तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता.

या घटनेनंतर पीडित मुलीने आपल्या मावशीला विचारले असता, मावशीने तिला आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ दाखविले. तसेच कोणाला सांगू नकोस, अशी दमदाटी केली. त्यानंतर वर्षभर

हा सर्व प्रकार सुरू राहिला. दरम्यान ज्या मुलाने मोबाइलमध्ये फोटो आणि व्हिडीओ तयार केला त्याने हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होता. तसेच ही धमकी देत तो पीडित मुलीला

वारंवार फोन करून तिच्या गावी जाऊन तिचे शोषण करत होता.मागील महिन्यात पीडित मुलीच्या गावी पुन्हा एक लग्न समारंभ असल्याने सर्व नातेवाईक तेथे आले. त्यावेळी मावशीने मुलीला बाहेर

चौकात फिरायला नेले त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला.मावशीविरोधात 376, 354, 328, 506 कलमांनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. दोन्ही आरोपींना अटक केली असून साकोली पोलीस पुढील तपास करीत आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!