माय महाराष्ट्र न्यूज:दैनिक सार्वमंथनचे संपादक अनिल कोळसे पाटील यांना शिव गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.जिल्हात सामाजिक , राजकिय, शैक्षणिक संकृतिक विषय यासह शासकीय
कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना आपल्या लेखनीच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचे काम करत असलेले राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथे शिवजयंती व शिव
गौरव पुरस्कार हा दरसाल दरवर्षी शिव प्रेमी सहभागी होऊन साजरा करतात अप्रतिम शिव गौरव पुरस्कार हा छत्रपतींच्या पावनभूमीत पुरस्कार मानकरी यांनाच दिला जातो सामाजिक, राजकिय, शैक्षणीक, क्षेत्रातील
योग्यरीत्या नियोजनबद्ध निवड करून पुरस्कार देऊन सत्कार करून शिवगौरव पुरस्कार देण्यात येतो. पत्रकारीतेच्या माध्यमातून अनिल कोळसे हे राजकिय, सामाजिक, लोकाभिमुख अन्यायला वाचा
फोडणारे व आपल्या लेखणीतून अनेकांना धारेवर धरुण ,प्रशासनाला जागे करणारे धडाडीचे कर्तृत्ववान काम परिपुर्ण करणारे असे व्यक्तिमहत्व असल्यामुळें त्यांना गावात,तालूक्यात नव्हें तर जिल्हयात
पत्रकारीता क्षेत्रातील निर्भिड पत्रकार म्हणून शेरी चिखलठाण पंचक्रोशीतील युवक,ग्रामस्थ व शिवप्रेमीं शांतीरामभाऊ काकडे मित्र परिवार आयोजित अविस्मरणीय आठवण म्हणुन शिव गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संपादक व निर्भिड पत्रकार म्हणून अनिलराव कोळसे यांना शिव गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी देवळाली प्रवरा चे मा.उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, शांतारामभाऊ काकडे, लोकनियुक्त सरपंच डॉ. सुभाष काकडे ,
उपसरपंच आबासाहेब काळनर,गंगाधर काकडे चांगदेव काकडे सर,गाडेकर सर,दुधावडे सर,सारोक्ते सर,पत्रकार शेख युनुस ,सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे
यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.अनिल कोळसे यांचे विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.