Friday, May 20, 2022

श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीराम साधना आश्रम मुकींदपूर येथे गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते धर्मध्वजारोहण महोत्सवाला प्रारंभ

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : राहुल कोळसे:नेवासा तालुक्यातील मुकींदपूर चारी क्रमांक तीन जवळ असलेल्या रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमाच्या वतीने आयोजित श्रीराम जन्मोत्सव कीर्तन महोत्सवाचा

शुभारंभ प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय चा जयघोष करत गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते धर्मध्वजारोहणाने करण्यात आले.श्रीराम साधना आश्रमामध्ये होणाऱ्या श्रीरामकथेच्या

माध्यमातून अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करा तसेच गावाचे वैभव असलेल्या मठ मंदिराचे पावित्र्य सांभाळा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलतांना केले.यावेळी झालेल्या

धर्म ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली.श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या शोभायात्रेत गुरुवर्य भास्करगिरी

महाराजांच्या समवेत संत महंत सहभागी झाले होते.श्रीराम साधना आश्रमाच्या प्रांगणात मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर सियावर रामचंद्र की जय ..जय श्रीराम..असा जयघोष करत धर्म ध्वज पूजन करून

ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी झालेल्या संतपूजन कार्यक्रम प्रसंगी महंत सुनीलगिरी महाराजांनी उपस्थित भाविकांचे स्वागत केले.यावेळी महंत रमेशानंदगिरी महाराज,महंत गोपालानंद गिरी महाराज,

महंत विष्णूदेवा नंदजी महाराज,महंत शुक्लभारतीजी महाराज,महंत हौसानंदपुरी महाराज,महंत माधवानंदगिरी महाराज,महंत सुदर्शननाथ,महंत ऋषीनाथ महाराज,महंत विश्वभारतीजी महाराज,महंत पंचमपुरीजी महाराज, रामायणाचार्य

अमृतानंद महाराज कांकरिया,हभप कारभारी महाराज झरेकर,साध्वी चैतन्य सुवर्णानंद महाराज,साध्वी अमृतानंद सरस्वती, गणपत महाराज आहेर,बाळू महाराज कानडे,लक्ष्मीनारायण जोंधळे यावेळी धर्म पिठावर उपस्थित होते.

श्रीराम जन्मोत्सव व कीर्तन महोत्सव शुभारंभ प्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे,पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे,उपसभापती किशोर जोजार,

मुकींदपुरचे सरपंच सतीशदादा निपुंगे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के,होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे,अशोक निपुंगे, नाथाभाऊ पंडीत, भिवाजी आघाव,मुरमे गावचे सरपंच अजय साबळे,

गोधेगावचे सरपंच राजेंद्र गोलांडे,पी.आर. जाधव, पोपटराव निपुंगे, रावसाहेब घुमरे,बी.के. पवार,अशोक ढगे,रामकृष्ण कांगुणे,दत्ताभाऊ कांगुणे, बाळासाहेब भागवत,दशरथ मुंगसे,के.एम.बाबा फाटके, भाऊसाहेब निपुंगे,ज्ञानेश्वर महाराज हजारे,

आडभाई महाराज, हभप आवारे महाराज,नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण, पिचडगावचे सरपंच चंद्रकांत कामटे, त्रिमूर्तीचे प्राचार्य सचिन कर्डीले यांच्यासह त्रिमूर्ती संकुलाचे विद्यार्थी, शिक्षक,पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

प्रा.अशोक गाडे व डॉ.रेवणनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले.महंत सुनीलगिरी महाराज यांनी संत महंतांसह भाविक भक्तांचे आभार मानले. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

(व्हाट्सअप वर बातम्या येण्यासाठी 8805375275 हा नंबर तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा)

ताज्या बातम्या

महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान

माय महाराष्ट्र न्यूज:अ‍ॅथलीट म्हटलं तर दररोजचा व्यायाम आलाच. फिट राहण्यासाठी रोज सकाळी पहाटेची झोप मोड करत व्यायाम करावाचं लागतो. तसेच सेक्स लाईफबाबतही अनेक खेळाडूंना कॉम्प्रॉमाईस...

नगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यातील घटना:मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत मग काय घडले नको ते

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.आईच्या अनैतिक संबंधामुळे...

बँकेच्या नियमात मोठा बदल, व्यवहारासाठी आता या गोष्टी आवश्यक

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकार लोकांच्या सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आवश्यक ती पावले उचलत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी मोदी...

ATM मधून कॅश काढण्याच्या नियमात बदल, अन्यथा

माय महाराष्ट्र न्यूज:बँकिंग व्यवहारात एटीएममधून पैसे काढणं हा प्रत्येकाच्या गरजेचा भाग बनला आहे. पण अनेकदा एटीएम कार्डमधील माहितीचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे...

हेल्मेट घातलं असेल तरी भरावा लागणार दंड

माय महाराष्ट्र न्यूज:हेल्मेट न घालता दुचाकी चालवल्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. पण आता हेल्मेट घातलं असेल तरी चालान कापलं जाऊ शकतं. हे चलनही थोडं-थोडकं नसून...

नगर ब्रेकिंग:सोशल मीडियावर बनावट अकाऊंट: अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि चीड आणणारी बातमी समोर आली आहे.इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाऊंट तयार करून तसेच अश्लील मेसेज...
error: Content is protected !!