माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाची तिसरी लाट जरी ओसरली असतली, तरीही मुंबई महापालिका प्रशासन अजूनही गाफील नाही. कारण काही देशात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्याच धर्तीवर मुंबई
महापालिकेकडून अजूनही काही महात्वाच्या चाचण्या करण्यात येत आहे. अशा चाचण्यांचा एक महत्वपूर्ण अहवाल समोर आला आहे. यात मुंबईत तब्बल 99.13 टक्के रुग्णांमध्ये
ओमायक्रॉन असल्याचे समोर आले आहे. तर कोरोनामुळे पुन्हा एकदा धास्ती वाढली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट XE आणि Kappa चे मुंबईत रुग्ण आढळून आले आहे. XE व्हेरिएंटचे हे देशातील पहिले
प्रकरण आहे. जीनोम सिक्वेन्सिंग दरम्यान एकूण 376 नमुने घेण्यात आले, त्यापैकी 230 मुंबईतील आहेत. जीनोम सिक्वेन्सिंग चाचणीची ही 11वी बॅच होती. 230 पैकी 228 नमुने ओमिक्रॉनचे आहेत,
उर्वरित – 1 कप्पा व्हेरिएंट आणि XE व्हेरिएंटचा आहे. त्यामुळे आरोग्य विभाग पुन्हा अलर्ट मोडवर आला आहे. कोविड 19 विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग)
करणाऱ्या चाचण्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या आदेशानुसार नियमितपणे केल्या जात आहेत.
कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात येवून जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे. असे असले तरी जगातील अनेक भागांमध्ये कोविड संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही.
त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन स्वयंस्फूर्तीने कायम ठेवले पाहिजे. मास्कचा स्वेच्छेने किमान गर्दीच्या ठिकाणी उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे
पालन केले पाहिजे. कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर प्रत्येकाने वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे देखील आवश्यक आहे, असेही पालिकेकडून सांगण्यात आले आहेत.