माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षाही करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या आहेत. मात्र बोर्डाच्या परीक्षांचा निकाल
नेहमीपेक्षा उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.एप्रिल महिना सुरु आहे त्यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत.
तर काही राज्यांमध्ये बोर्डाच्या परीक्षा होऊन गेल्या आहेत. आता मात्र विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा करत आहेत. महाराष्ट्रात शिक्षण ऑनलाईन झालं मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्यामुळे
अनेक विद्यार्थी नाराजही होते. ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात म्हणून काही विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. मात्र यानंतरही राज्यात बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्यात.
राज्यात बोर्डाच्या परीक्षा या दरवर्षीच्या तुलनेत उशिरा घेण्यात आल्यात. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या साधारतः नेहमीपेक्षा काही दिवस उशिरा सुरु झाल्या. त्यात CBSE टर्म दोन ही परीक्षा
अजूनही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षांचे निकाल हे उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 10 जून पूर्वी दहावीचा आणि 15 जूनपुर्वी
बारावीचा निकाल लागणं अपेक्षित आहे. म्हणूनच राज्य महामंडळाच्या अध्यक्षांनी दहावी आणि बारावीचे पेपर तपासणीबाबत आढावा घेतला. या आढाव्यात औरंगाबाद विभाग
वगळता सर्वंच मंडळाचे तब्बल 90% पेपर तपासून झाल्याचं सांगण्यात आलं आहे.