Wednesday, May 25, 2022

नगरमध्ये भर कार्यक्रमात सुजय विखेंनी उपमुख्यमंत्री पवारांच्या कानगोष्टी करत होते पण, दादांनी ४ वेळा हात जोडले….

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये आज कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार सुजय विखे पाटील, आमदार आशितोष काळे यासह विविध राजकीय पक्षाचे नेते आमदार उपस्थित होते.

विखे आणि पवार यांच्यातला राजकीय वाद साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. २०१९ च्या लोकसभेला हा वाद प्रकर्षाने साऱ्या राज्याने पाहिला. राधाकृष्ण विखे पाटलांचे चिरंजीव सुजय विखे

यांच्यासाठी नगरची जागा सोडण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्यानंतरच विखेंनी काँग्रेसला रामराम ठोकला. दरम्यान या घटनेला आता तीन वर्ष होत आलीत. एव्हाना राजकीय कटुताही कमी झालीय. हेच चित्र

आज कोपरगावमधील एका कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्राने पाहिलं. कार्यक्रमस्थळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं भाषण सुरु होतं. तितक्यात खासदार सुजय विखे पाटील आपल्या खुर्चीवरुन उठून

शेजारी असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कानाला लागले. ते अजितदादांना कसलीशी विनंती करत होते. दरम्यानच्या ३० सेकंदात अजितदादांनी त्यांना ४ वेळा हात जोडले.

दरम्यान झाले असे की कार्यक्रमस्थळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं भाषण सुरु होतं. तितक्यात खासदार सुजय विखे पाटील आपल्या खुर्चीवरुन उठून दोन चारखुर्च्यांपलीकडे बसलेल्या अजित पवार यांच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले. अजित

पवार शेजारी बसलेल्या नेत्याशी कानगोष्टी करत होते. सुजय विखे आपल्याशी बोलण्यासाठी आलेत, हे पाहून अजित पवार यांना सुजयकडे कटाक्ष टाकला. मग जवळपास २० ते २५ सेकंद सुजय विखे-अजित पवार

यांच्यात कानगोष्टी सुरु होत्या. सुजय विखे त्यांना कसलीशी विनंती करत होते. मात्र अजित पवार यांनी नको नको म्हणत होते. दरम्यान संवादावेळी अजित पवार यांनी ४ वेळा सुजय विखेंना हात जोडले.

ताज्या बातम्या

मुळा-निळवंडे धरणाच्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे सर्वेक्षणासाठी २ कोटी ३७ लाखांहून अधिक निधी-मंत्री शंकरराव गडाख

नेवासा/सुखदेव फुलारी नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या जलाशय-नदीवरील आणि निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावरील एकूण १७ उपसा सिंचन योजनांचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी...

वर पक्षाकडून वधू कुटुंबीयांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा

भेंडा(नेवासा) नेवासा तालुक्यातील भेंडा येथील काळे परिवाराने विवाह सोहळ्यानिमित्त एक अनोखा उपक्रम राबविला.वरपक्षाने लग्नाच्या दिवशी वधूच्या कुटुंबातील 12 व्यक्तींची प्रत्येकी 10 लाखा रुपयांची विमा पॉलिसी...

साखर निर्यातीवर बंदी नसल्याचा विस्माचा खुलासा

नेवासा/सुखदेव फुलारी काल केंद्र सरकारने अचानक साखर निर्यातीवर बंदी घातल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यामुळे साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मध्ये चिंतेचे वातावरण...

प्रसिद्ध गायिकेचा MMS व्हिडिओ लीक; सिनेसृष्टीत खळबळ

माय महाराष्ट्र न्यूज:अलीकडे सोशल मीडियावर जर कोणाची सगळ्यात जास्त चर्चा असेल तर ती म्हणजे भोजपुरी गायिका शिल्पी राजची. युट्युबसह अनेक प्लॅटफॉर्मवर काही आक्षेपार्ह लोकांनी शिल्पी...

खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारचा मोठा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरनंतर आता खाद्यतेलही स्वस्त होणार आहे. सरकारने खाद्यतेलावरील...

सोने दरात घसरण, तर चांदीचा भाव वधारला

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या घसरणीमुळे आज सकाळी भारतीय बाजारात सोने दरात घसरण झाली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या वाढीनंतर आज बुधवारी...
error: Content is protected !!